आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड हजार लघुउद्योजकांना मिळाली करामध्ये ३० कोटी रुपयांची सूट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात लघुउद्योजकांना कॉर्पोरेट करात टक्के सवलत दिल्याने औरंगाबादेतील १५०० लघुउद्योजकांना ३० कोटी रुपयांचा फायदा हाेणार आहे. या लघुउद्योजकांची वार्षिक उलाढाल आठ हजार कोटींच्या घरात आहे. त्यांच्या नफ्याची टक्केवारीही आठ टक्के आहे. त्यामुळे औरंगाबादेतील पंधराशे लघुउद्योजकांना ३० कोटींचा लाभ हाेणार आहे. एवढ्या कमी कराची सवलत मिळणार आहे. 

आयकर विभाग प्राप्तिकराच्या रूपातच लघुउद्योजकांकडून कर वसूल केला जातो. औरंगाबादेत सर्व मिळून साडेतीन हजार उद्योग आहेत. सर्वांची उलाढाल एकत्र केली तर ४० हजार कोटी रुपये इतकी वार्षिक उलाढाल होते. यात ५० टक्के लघुउद्योजक आहेत ज्यांची वार्षिक उलाढाल ५० कोटींच्या खाली आहे. केंद्र सरकारने अशा उद्योजकांना ३० टक्क्यांऐवजी २५ टक्के एवढा कर लागू करून टक्के सूट दिली आहे. या निर्णयाचा मोठा फायदा लघुउद्योजकांना झाला आहे. या निर्णयामुळे छोटे उद्योग बंद पडणार नाहीत, ते ताकदीने उभे राहतील, अशा भावना उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या. त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’चा हा खास रिपोर्ट. 

आधीकाय परिस्थिती होती? : लघुउद्योजकांनाकर भरण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. मोठ्या कंपन्या पेमेंट लांबवतात. अशा वेळी प्रॉफिट मार्जिन कमी होत जाते, कारण कर वेळेवर भरावा लागतो. तो टाळता येत नसल्यामुळे लघुउद्योग बंद होण्याचे प्रमाण मोठे आहे. चिकलठाणा, पैठण उद्योग वसाहत आणि रेल्वेस्टेशन येथील एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद पडले आहेत. देशात ९६ टक्के रोजगार देणारे हेच सेक्टर आहे, अशी नोंद अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्याचा विचार पहिल्यांदाच बजेटमध्ये केला गेला. 

मोठाफरक पडेल... : सरकारनेघेतलेला हा निर्णय लघुउद्योजकांसाठी फायद्याचा आहे. पाच टक्के कर सवलत एकदम दिल्याने निश्चितच मोठा फरक पडेल. यामुळे करांचा बोजा कमी होण्यास मदत झाली आहे. 

एकाच मालकाचे अनेक लघुउद्योग असेल तरीही फायदा : समजाएखाद्या उदयोजकाचे चार वेगवेगळे लघुउद्योग असतील अाणि त्यांचे वेगवेगळे रजिस्ट्रेशन केले असेल तर त्या सर्व युनिटला वेगवेगळा पाच टक्यांचा फायदा मिळणार आहे. कारण प्रत्येक युनिटचा कर वेगळा भरला जातो. त्याची एकत्रित उलाढाल पकडता ती त्या युनिटपुरती मर्यादित असते. याचाही चांगला फायदा होणार आहे. म्हणजे चार उद्योग असणाऱ्याला २० टक्के सूट मिळणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...