आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शापूरजी पालनजी’ला डीएमआयसीचे कंत्राट, अडीच वर्षांत काम होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्रा ते बिडकीन या दहा हजार हेक्टर भागात होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामांचे पहिले कंत्राट शापूरजी पालनजी या कंपनीला मिळाले आहे. जानेवारी २०१६ पासून या कामांचा शुभारंभ होणार असून, पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधांची कामे केली जातील.

ऑगस्ट २०१५ मध्ये ८२५ कोटी रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा जागतिक स्तरावर डीएमआयसीतर्फे स्थापन केलेल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप कंपनी लि. च्या वतीने खुल्या पद्धतीने मागवण्यात आल्या होत्या. त्या लार्सन अँड टुब्रो, शापूरजी पालनजी, नागार्जुन कन्स्ट्रक्शन या समूहांनी भरल्या होत्या. सर्वात कमी किमतीची म्हणजे ६५६.८९ कोटी रुपयांची निविदा शापूरजी पालनजी या कंपनीची आहे. त्यामुळे शासनाला १३० कोटींचा फायदा झाला आहे. उद्योग विभागाचे प्रधान सचिव तथा एआयटीएल कंपनीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा यांनी ही घोषणा शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत केली. या संचालक मंडळावर मराठवाडा मानव मिशनचे आयुक्त भास्कर मुंडे असून, त्यांनी ही माहिती ‘दिव्य मराठी’ला दिली.
जानेवारी २०१६ मध्ये डीएमआयसीच्या कामांचा श्रीगणेशा होत आहे. यात शेंद्रा-बिडकीन उद्योग वसाहतीतील रस्ते, पूल, भूमिगत गटारे, वीजपुरवठा अशी पायाभूत सुविधांची कामे केली जातील. ही कामे अडीच वर्षांत पूर्ण करण्याची अट
घालण्यात आली आहे.
- डीएमआयसीची निविदा टाटा समूहाच्या कंपनीला मिळाली आहे. त्यात शासनाला १३० कोटींचा फायदा झाला आहे. कंपनी जानेवारी २०१६ च्या पहिल्या आठवड्यातच काम सुरू करणार आहे.
- भास्कर मुंडे, संचालक, एआयटीएल कंपनी तथा आयुक्त, मानव विकास मिशन