आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडू कारल्याने आणला तांबे कुटुंबाच्या जीवनात गोडवा! अवघ्या 20 गुंठ्यांत 4 लाखांचे उत्पन्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज- कारल्यात असणाऱ्या कडू तत्त्वांमुळे, ‘कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी ते कडूच’ अशी जुनी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे, परंतु, या कडू कारल्यानेच वैजापूर तालुक्यातील गारजचे शेतकरी रवींद्र तांबे यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे. कमी पाण्यात कमीत कमी खर्चात लाखोंचे उत्पादन मिळून देणारे कारल्याचे भरघोस उत्पादन तांबे यांनी घेऊन इतर शेतकऱ्यांसमोरही आदर्शही ठेवला आहे. 

रवींद्र तांबे यांनी २० गुंठे (अर्धा एकर) शेतामध्ये एप्रिल महिन्यात कारले पिकाची लागवड केली. यासाठी त्यांना बी- बियाणे, औषधी, बांबू ठिबक यासाठी त्यांना २५ हजार रुपये खर्च आला. हा खर्च वजा करता त्यांना तीन महिन्यांत साडेचार लाख रुपयांचा कारल्याच्या उत्पादनावर नफा मिळवला. तीन महिन्यांत त्यांनी शंभर क्विंटल कारले विकले. मुंबई ,नाशिक, मालेगाव येथील व्यापाऱ्यांनी ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने तांबे यांच्याकडून हे कारले खरेदी केले. आणखी ६० हजारांचे उत्पादन होईल, असे तांबेंनी सांगितले. भाजीपाल्यांचेही उत्पादन तांबे घेत आहेत. विशेष म्हणजे मुंबई ,नाशिक, मालेगाव, वाशीमचे व्यापारी स्वत: येऊन कारल्याचा माल खरेदी करतात, तर औरंगाबाद शहरात स्वत: कारल्याची ४० रुपये दराने विक्री करत असल्याचे रवींद्र तांबे यांनी सांगितले. 

- ४० ते ५० रुपये प्रतिकिलो मिळतोय कारल्याला दर 
- २० अर्धा एकर शेतामध्ये घेतले कारल्याचे उत्पन्न 

कुटुंबीयांची साथ 
कारल्यासहसर्वभाजीपाल्यांचे आजपर्यंत उत्पादन घेतले होते. नेहमी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हवामानाचा अंदाज घेऊन तीन महिन्यांत भरघोस कारल्याचे उत्पादन घेण्याची किमया साध्य करता आली. यासाठी भाऊ, पत्नी यांची मोठी साथ मिळाली. 
- रवींद्र तांबे, शेतकरी, गारज, ता. वैजापूर. 
 
उत्पादनासाठी असा प्रयत्न 
सुरुवातीलाट्रॅक्टरने सरी पाडून बाय फुटावर कारले बियाण्यांची लागवड केली. उगवल्यानंतर प्रत्येक सरीला शेणखताचा डोस दिला. बाबूंचे मंडप बांधून आतापर्यंत प्रत्येक १५ दिवसाला जादू बायोस्टीन औषधाच्या तीन फवारण्या केल्या. ठिबकद्वारे दोन किलो मायक्रो न्युटन सूक्ष्म अन्नद्रव्य ह्युमिक एसिड १९१९ खताचे एक दिवसानंतर डोस देण्यात येतो, असे रवींद्र तांबे यांनी माहिती दिली. 
बातम्या आणखी आहेत...