आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापाबद्दलच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- ग्रामीणभागात सापाविषयी अनेक गैरसमज, अंधश्रद्धा आहेत. त्यातून अनेकदा साप आढळून आला की त्याला तत्काळ मारले जाते. साप हा शेतकऱ्यांचा शत्रू नसून मित्र आहे. तो जीवसृष्टीतला एक महत्त्वाचा घटक असून साप आढळल्यास घाबरून जाऊन त्याला मारता सर्पमित्राला बोलवावे. तसेच कळत-नकळतपणे सर्पदंश झाल्यानंतर मांत्रिक बुवाकडे जाता उपचारासाठी थेट रुग्णालय गाठावे. तसेच या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जालना येथील सर्पमित्रांनी केले आहे.

सर्पमित्र रितेशसिंह ठाकूर यांनी माहिती दिली की, साप चावल्यानंतर दातांच्या खुणा जवळजवळ उमटतात. अशा खुणा उमटल्या तर तो साप विषारी आहे, असे समजावे. सर्पदंश झाल्यास व्यक्तीचा घसा कोरडा पडतो. तसेच श्वास घेण्यास त्रास होतो. दंश झालेला भाग बधिर होत जातो. मज्जासंस्था प्रभावित होते. मात्र, सर्पदंश झाल्याची जाणीव झाल्यानंतर घाबरून जाता ज्या ठिकाणी दंश झाला तो भाग खाली वर रुमालाने अति घट्ट बांधावा, जेणेकरून रक्तस्राव होऊ नये ते विष शरीराच्या इतर भागात पोहोचू नये. नंतर त्वरित रुग्णास रुग्णालयात न्यावे. साप कोठे आढळून आल्यास त्याला मारता सर्पमित्राच्या मदतीने जंगलात सोडण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जालना परिसरात आढळलेला नाग पकडताना सर्पमित्र
परिसरात आढळणारे साप
कोब्रानागाचा रंग हा किटक गव्हाळी, काळा, तपकीरी या रंगाचा असून लांबी ते फूट असते. घोणस प्रकाराचा साप काटेरी झुडपे, बिळांमध्ये वास्तव्य करतो. मण्यार फुरसे नावाचा साप दगड, विटांचा ढीग, वारुळे आदी ठिकाणी आढळतो.

घोणस साप विषारी
भारतातआढळणाऱ्या चार विषारी सापांपैकी घोणस या सापामुळे अधिक प्रमाणात मृत्यू होतात. सर्पदंश झाल्याचा कल्पनेने बऱ्याच जणांचा रक्तदाब, नाड्यांचे ठोके वाढल्याने सर्पाचे विष शरीरात लवकर भिनते, त्यामुळे दक्षता घेऊन भिता डॉक्टरांकडे जावे.

विष मंत्राने उतरत नाही
ग्रामीणभागात मांत्रिक मंत्राचा वापर करून सापाचे विष उतरवतात, अशी अंधश्रद्धा आहे असा नागरिकांचा गैरसमज आहे. अशा प्रकारे कुठल्याही मंत्रतंत्राने सापाचे विष उतरवता येत नसून चुकीच्या समजुतीमुळे वेळीच उपचार मिळाल्यास सर्पदंश झालेला व्यक्ती दगावू शकतो. सर्पदंश झाल्यास कोणत्याही शासकीय दवाखान्यात संबंधित व्यक्तीस नेऊन उपचार करून घ्यावेत. सर्पदंश झाल्यावर थेट दवाखाना गाठावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.

साप निघाल्यास संपर्क करा
भागवत परासे ९७६४५४९९७३, इमरान शेख ९९२२४९०४६३, शरद पाटोळे ९६०४३०२५३४, नवनाथ तुपे ९६८९५९३९४४, अमोल सोनवणे ७०८३२२१९०९, शरद जावळे ९०११४२०६२९, कृष्णा वाघमारे ९७६७३२४०७०.
शेतकऱ्यांचा मित्र