आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: मंगळसूत्र चोरट्याची पोलिसांशी झटापट; शेवटी झाला जेरबंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मंगळसूत्र चोरी, घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने शहरातून एक वर्षासाठी हद्दपार केलेल्या अट्टल गुन्हेगाराला शहरात फिरताना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. हरीश मारुती सोळुंके ऊर्फ नक्का (२५, रा. फुलेनगर, हर्सूल) असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखा पोलिसांशी झटापट करत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांनी त्याला खाक्या दाखवत जेरबंद केले. 
 
नक्कावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत; परंतु मंगळसूत्र चोरी प्रकरणात त्याला अटक झाली असता न्यायालयाने त्याला एका वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगल्यानंतर त्याला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी गुन्हे शाखेचे पथक किलेअर्क भागात गस्तीवर असताना त्यांना तो परिसरात वावरताना दिसला. पोलिस दिसताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्याला पाठलाग करून लेबर कॉलनी भागात पकडले. परंतु त्यानंतरही त्याने पोलिसांशी झटापट केली. या प्रकारामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्याला गुन्हे शाखेत आणून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी झिने, विलास वाघ, तुकाराम राठोड, विशाल सोनवणे रवी दाभाडे यांनी ही कामगिरी बजावली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...