आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाई भिक्षा मागायची, ती करतेय भिक्षेकऱ्यांना मदत, ‘व्हॅलेंटाइन्सडे’ ऐवजी ‘रोटी डे’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘व्हॅलेंटाइन्सडे’ म्हणजे प्रेमवीरांसाठी महत्त्वाचा दिवस. मात्र, केटीएचएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मात्र हा दिवस गाेरगरिबांना भाजी-पाेळी देऊन ‘राेटी डे’ म्हणून साजरा केला. समाजशास्त्र विभाग अाणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला. 

महाविद्यालयाचा रोहित पवार या तरुणाच्या संकल्पनेला दाद देत सर्व मित्रांनी एकत्र येत सर्वांनी मंगळवारी सकाळच्या सुमारास भाजी, चटणी चार पोळ्या आणत समाजाप्रती आपल्याला असलेली कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर रॅलीच्या स्वरूपात अशोकस्तंभावरील ढोल्या गणपती मंदिराबाहेर बसलेल्या गरजू लोकांना खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर गंगाघाटावरील रामकुंड परिसर, कपालेश्वर मंदिर, गौरी पटांगण परिसरात गरजू लोकांना लहान मुलांना पोळ्यांचे वाटप करण्यात आले.

सरते शेवटी गंगाघाटावरील लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या “बालांगण’ या संस्थेला भेट देण्यात आली. या ठिकाणी आल्यावर संस्थेचे संचालक सचिन मेढे, ज्याेती साळुंके, प्रवीण वाघमारे यांनी मुलांशी संवाद साधत संस्थेची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. या ठिकाणी रोहित पवार, रवींद्र नाईकवाडे गोदावरी देवकाते यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी रिंकू जाधव, उन्नती कोठी, विजया बडोगे, तनुजा आल्हाटे, वृषाली खुर्हे, राहुल कोठे, मनीष रोकडे, मयूर पवार, सोहेल शेख, अाफरिन मणियार, दीपाली पाईकराव, नेहा तिडके यांनी सहभाग घेतला. 

तिची अाई भिक्षा मागायची, अाज भिक्षेकऱ्यांना ती करतेय मदत 
‘राेटीडे’ च्या उपक्रमात लक्षवेधी ठरली ती गाेदावरी देवकाते ही विद्यार्थिनी. गाेदावरीची अाई नाशिकराेडच्या इच्छामणी गणपती मंदिरासमाेर भिक्षा मागायची. सातवी-अाठवीपर्यंत गाेदावरी रस्त्यावरच वाढली. त्यानंतर छाेटेखानी खाेलीत या मायलेकी भाडेतत्त्वावर राहत. परिस्थितीवर मात करत दहावीला गाेदावरीने ७८ टक्के गुण पटकावले. या बाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यावर दानशूरांनी तिला मदतीचा हात दिला. त्यात कुणी शिक्षणाची जबाबदारी घेतली, तर कुणी घरभाड्याची. या मदतीची जाणीव ठेवत गाेदावरीने अभ्यास केला अाणि बारावीलाही ७८ टक्के गुण मिळविले. तिला यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण हाेऊन जिल्हाधिकारी बनायचे अाहे. ‘राेटी डे’च्या उपक्रमात गाेदावरीचा सहभाग उल्लेखनीय हाेता. यापूर्वीचे तिचे जगणे ‘राेटी डे’च्या निमित्ताने लख्खपणे डाेळ्यांपुढे तरळले अन् अापसुकच या अाठवणी अश्रूंच्या रूपाने बाहेर पडल्या. 
बातम्या आणखी आहेत...