आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : अधिकाऱ्यांचा ‘कचरा’ करण्याची मनपाच्या विशेष सभेत रणनीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद  - शिवसेना नगरसेवकांनी मागणी केल्याने शुक्रवारी (१२ मे) घनकचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छतेत आपण कोठे कमी पडलो यावर चर्चा करण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेत या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचा कसा ‘कचरा’  करता येईल यासाठी नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले. विशेषत: शिवसेनेच्या नगरसेवकांनी तशी रणनीती आखली आहे.
 
स्वच्छतेत गतवर्षी ५६ व्या क्रमांकावर असलेले आपले शहर यंदाच्या गुणतालिकेत २९९ क्रमांकापर्यंत घसरले. आपल्या शहराची अशी अधोगती का झाली, आपले प्रशासन कोठे कमी पडले, प्रशासनाने काय करायला हवे होते, प्रत्यक्षात काय केले, यापुढे काय करायला हवे, यावर चर्चा करण्यासाठी ही सभा होत आहे. शहराचे गुणांकन जाहीर झाले त्याच दिवशी शिवसेनेने अशी सभा घेण्याची मागणी केली होती. परंतु बैठकीत नेमके काय होणार याचा अंदाज आल्याने प्रारंभी महापौर भगवान घडमोडे यांनी याला बगल दिली. परंतु स्थायी समितीच्या सहा सदस्यांनी मागणी केल्याने अखेर त्यांना ही सभा बोलवावी लागली.  
 
भाजपवर खापर फोडण्याचा प्रयत्न : सभेत अधिकाऱ्यांना कसे घेरायचे यासाठी शिवसेना नगरसेवकांची गुरुवारी सायंकाळी बैठक झाली. नेमक्या कोणत्या मुद्द्यावर आपण चर्चा करायची याचे नियोजन त्यात करण्यात आले आहे. सेनेच्या चर्चेला भाजपकडून बगल दिली जाण्याची शक्यता गृहीत धरून यासाठी वेळप्रसंगी एमआयएमची मदत घेण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. घडमोडे महापौर झाल्यापासून शहर स्वच्छता अभियान हे फक्त भाजपचेच असल्याचे चित्र तयार झाले होते. त्यामुळे स्वच्छतेत शहर पुढे आले असते तर अर्थातच त्याचे श्रेय भाजपने घेतले असते. आता अपयश आल्याने त्याचे खापरही भाजपवर फोडण्याचा प्रयत्न सेनेकडून केला जाणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...