आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिजल्ट से नहीं, रिश्तेदारों से डर लगता है साहब !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दहावी परीक्षेचा निकाल जूनला जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये याची भीती दिसून येत आहे. ‘रिजल्ट से नहीं, रिश्तेदारों से डर लगता है साहब’ हा संदेश व्हॉट्सअॅप आणि सोशल नेटवर्किंगवर जोरदार फिरताना दिसून येत आहे.
विविध परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या निकालांचे सत्र सुरू आहे. ‘का, मग कधी निकाल लागणार आहे? फर्स्ट क्लास येईल की डिस्टिंगशन?’ अशी चर्चा प्रत्येक घरात सुरू आहे. मात्र, ज्यांचा निकाल आहे त्यांना मात्र कुणीच विचारेनासे झाले आहे. म्हणून सध्या सर्वच सोशल मीडिया आणि मित्रांचा कट्टा रंगताच ‘अरे यार, क्या कहू, अब तो मुझे रिजल्ट से नहीं बल्की रिश्तेदारों से डर लगता है.’ जिथे जावे तिथे असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आम्ही जाम वैतागलो आहोत, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत. शिवाय दहावीच्या निकालानंतर करिअरची दिशा आणि कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा हे ठरवायचे आहे. पण नुसतीच अफवा कानी येते आहे.
अनेक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर दहावीचा निकाल जूनला जाहीर होणार आहे. पण तत्पूर्वी सोशल मीडियावर नानाविध संदेश पडत आहेत. यामुळे आमच्यात संभ्रम निर्माण होतो आहे, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

आमचीदेखील निकालाप्रति उत्सुकता शिगेला पोहोचली आहे; परंतु या सोशल मीडियाच्या दबावाबरोबरच आई-बाबा, नातेवाइकांच्या अपेक्षा आणि इच्छांचे ओझे आमच्या माथी मारले जात आहे, असे विद्यार्थी मंडळी म्हणत आहेत. या विचाराने ते जेरीस आले आहेत. निकालापेक्षा नातेवाइकांचाच अधिक ताण असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
बातम्या आणखी आहेत...