आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये ST कर्मचाऱ्यांच्या अचानक अांदाेलनाने बससेवा 8 तास ठप्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंचवटी बस डेपाेमध्ये काम बंद अांदाेलनप्रसंगी घाेषणा देताना एसटी कर्मचारी. - Divya Marathi
पंचवटी बस डेपाेमध्ये काम बंद अांदाेलनप्रसंगी घाेषणा देताना एसटी कर्मचारी.
नाशिक - एस.टी. महामंडळाने बसफेऱ्या कमी केल्याने तसेच नादुरुस्त बसची संख्या वाढल्याने काम नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाने ५० चालक ५० वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतले. प्रशासनाच्या या कृतीच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. २२) एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक अांदाेलन करत पंचवटी डेपाेचे कामकाज बंद पाडले बससेवा बंद ठेवली. यामुळे शहरातील बससेवा अाठ तास ठप्प झाल्याने शाळा-महाविद्यालयाचील विद्यार्थी, प्रवासी यांचे अताेनात हाल झाले. रिक्षा टॅक्सीचालकांनी या परिस्थितीचा फायदा घेत प्रवाशांची अडवणूक करत जादा भाडे अाकारले. दरम्यान, काम उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाने लेखी अाश्वासन दिल्यानंतर रात्री वाजता बससेवा पूर्ववत सुरू झाली. 
 
शहर बससेवेचा ताेटा दिवसेंदिवस वाढत असल्याने एसटी प्रशासनाने शहर बससेवेच्या फेऱ्या कमी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणामुळे पंचवटी डेपोतून साेडण्यात येत असलेल्या १८५ बसपैकी ४५ बस दुरुस्तीसाठी डेपोमध्ये गेल्या काही दिवसांपासून उभ्या आहेत. परिणामी रोज साधारणत: ५० चालक वाहकांना काम मिळत नसल्याने त्यांच्याकडून एसटी प्रशासनाकडून रजेचे अर्ज भरून घेतले जात हाेते. शहर बसच्या फेऱ्या कमी झाल्याने उर्वरीत बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत अाहे. यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच नादुरुस्त बसेस चालविण्यास नकार देत आरटीओच्या नियमाप्रमाणे बसेस उपलब्ध करून द्याव्यात, सर्व चालक-वाहकांना ड्यूटी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एसटी कर्मचाऱ्यांना बसफेऱ्या बंद करण्यात आल्या. या आंदोलनामुळे शहर बससेवेच्या बसेस पंचवटी डेपोत उभ्या करून देण्यात आल्याने शहरातील बससेवा ठप्प झाली. परिणामी शाळा, महाविद्यालयातून परतणारे विद्यार्थी, कामगार वर्गासह प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान सायंकाळी वाजता याबाबत विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांनी कर्मचाऱ्यांची चर्चा करून बसेसच्या दुरुस्तीसाठी स्पेअर पार्ट उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कर्मचाऱ्यांना ड्यूटी मिळतील याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 
 
या गाडीचे चाक त्या गाडीला, प्रशासनाचा अजब कारभार : रोजहजारो प्रवासी वाहतूक करणाऱ्या शहर बसेसपैकी ६० टक्के बसेसचे टायर खराब झाले आहेत. मात्र, नवीन टायर उपलब्ध होत नसल्याने या बसचे चाक त्या बसला असा अजब कारभार एसटी प्रशानाकडून केला जात आहे. या प्रकारामुळे अपघात घडल्यास त्याला काेणाला जबाबदार धरावे? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.  
 
चर्चेला पुढे काेण येणार, यातच गेला वेळ 
कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर विभागीय नियंत्रक यामिनी जोशी पंचवटी डेपोत आल्या. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, असा प्रस्ताव देण्यात अाला. मात्र त्यास नकार देत डेपोच्या आवारात सर्व कर्मचाऱ्यांसाेबत चर्चा करावी असे त्यांनी नियंत्रकांना सांगितले. चर्चेसाठी पुढे काेण येणार यात बराच वेळ गेला.चअखेर सायंकाळी सातच्या सुमारास विभागीय नियंत्रक कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा होऊन आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत लवकर निर्णय झाला असता तर शहरातील प्रवासी वेठीस धरले गेले नसते, असे काही कर्मचारी यावेळी म्हणाले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
>विद्यार्थ्यांचा उद्रेक, डेपातील दोन बसच्या काचा फोडल्या
>प्रवासी ताटकळत, रिक्षाचालकांकडून लूट 
>शहर बससेवची स्थिती अशी 
​>स्पेअरपार्ट अभावी डेपोत बसेस उभ्या...
बातम्या आणखी आहेत...