आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य थंडीने गारठले, निफाडमध्ये पारा 4 तर, परभणीत 5 अंशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशाच्या उत्तर तसेच वायव्य भागात पश्चिमी चक्रावात (वेस्टर्न डिस्टर्बन्स) सक्रिय राहिल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भ गारठला आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ४ अंश सेल्सियस झाली. मराठवाड्यात परभणी येथे ५ अंश तापमान नोंदण्यात आले. विदर्भात नागपुरात पारा ८.६ अंशांपर्यंत घसरला. नागपुरातील हा ४ वर्षांचे नीचांकी तापमान आहे. आणखी दोन दिवस थंडीची लाट  राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.  दरम्यान, या थंडीमुळे नाशकात एकाचा मृत्यू झाला अाहे.
 
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतासह विदर्भात थंडीची लाट आहे. तर महाराष्ट्र व उर्वरित महाराष्ट्रात थंड दिवस राहील. याचाच अर्थ मराठवाडा व उर्वरीत महाराष्ट्रात तापमान सरासरीपेक्षा ४.५ ते ६.५ अंशानी घटलेले राहील. राज्यात ग ुरुव ारी नाशिक जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव या आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुुळे राज्यात थंडीचा कडाका आणखी आठवडाभर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.