आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवाचे नाव घेतो आता तरी पास करा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कॉपी करणाऱ्यांबद्दल अनेक किस्से असतात. पण दहावी, बारावीत उर्तीण होण्यासाठी विद्यार्थी उत्तरपत्रिकेत भावनिक साद घालत असल्याचे समोर आले आहे. "देवाचे नाव घेतो पास करा' असे लिहिणाऱ्या किंवा धमकावणाऱ्यांना एक वर्ष परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
यंदा औरंगाबाद विभागात १२४ कॉपी केसेस आढळून आल्या होत्या. तसेच उत्तरपत्रिकेत देवाचे नाव लिहिणे, खाणा-खुणा करणे, आक्षेपार्ह मजकूर लिहिणे, देवा मला पास कर, चित्रपटाची स्टोरी लिहिणे अथवा पास केले नाही तर आत्महत्येची धमकी देणे, उत्तरपत्रिकेची पाने फाडणे असे प्रकार आढळून येतात. असे प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची बोर्डात वेगळी सुनावणी घेण्यात येते. या विद्यार्थ्यांवर बोर्डाच्या नियमाप्रमाणे वन प्लस वन म्हणजे एक वर्ष परीक्षेस बसण्यास बंदी करण्यात येते, अशा दहावीच्या १२१ आणि बारावीच्या १४४ अशा एकूण २५५ केसेस आल्या आहेत, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...