आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर मुख्याध्यापकांच्या पगारातून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जाईल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
औरंगाबाद - शंभर टक्के अनुदानित असलेल्या शाळेतील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना एमएनएस शिष्यवृत्ती परीक्षांच्या माध्यमातून मदत मिळते. परंतु अनेक शाळा वेळेत माहिती देत नसल्याने विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागते. ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन माहिती दिल्यास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मुख्याध्यापकांच्या पगारातून कापून दिली जाईल, अशा स्पष्ट शब्दांत माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी शाळांना सुनावले. 
 
 
दरवर्षी परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने एनएमएमएस (नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप) आठवीतील आर्थिकदृष्ट्या मागास, कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होते. या विद्यार्थ्यांना आठवी ते बारावीपर्यंत पाचशे रुपये महिना असे प्रतिवर्षी सहा हजार रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येतात. यासाठी ऑनलाइन आवेदन मागवण्यात येते. 
 
विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती शाळांनी ऑनलाइन पद्धतीने पाठवायची आहे. औरंगाबादमधील दरवर्षी हजार ते बाराशे विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. परंतु शाळा माहिती देत नसल्याने विद्यार्थी लाभापासून वंचित राहतात. ११८ शाळांमधील विद्यार्थी याचे लाभार्थी आहेत. परंतु आतापर्यंत केवळ १६ शाळांनी माहिती पाठवली आहे. 
 
विद्यार्थ्यांची माहिती पाठवणे ही मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. त्यामुळे यापुढे ज्या शाळा ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करणार नाहीत त्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या पगारातून लाभार्थीची शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात येईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. २५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत शाळांना अर्ज पूर्ण करता येतील. या वेळेत त्यांनी माहिती सादर करावी, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...