आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टरलाइट प्रकरणामध्ये दोघांना "एमपी'तून अटक, सुमीत खांबेकर, आगा खान यांना जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाळूजपरिसरातील कंपन्यांचे घातक रसायन खाम नदीत सोडल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या चार आरोपींपैकी दोघांना गुन्हे शाखेने मध्य प्रदेश येथून अटक केली. अनिलसिंग किशोरसिंग परिहार (५१, रा. सुभाषनगर, जि. इंदूर) आणि आशिष पोशाखीलाल जैन (४८, प्रल्हादनगर, जि. इंदूर) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनसेचा शहराध्यक्ष सुमीत खांबेकर आगा खान या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

अनिलसिंग, आशिष यांची बालाजी केमिकल्स नावाची कंपनी होती. २०१० मध्ये सदरील कंपनी बंद पडलेली असतानाही या कंपनीमार्फत खांबेकर शहरातील घातक रसायनाची विल्हेवाट लावण्याचा ठेका घेत होता. विषारी रसायनाची ठाणे जिल्ह्यात ठरवून दिलेल्या जागेवर विल्हेवाट लावण्याची परवानगी शासन देते. मात्र, हे रसायन अवैधरीत्या खाम नदीत सोडताना आरोपींना पोलिसांनी पकडले होते.

आणखी दोघांचा शोध सुरू
याप्रकरणात एकूण बारा आरोपी आहेत. यापैकी आतापर्यंत गुन्हे शाखेला दहा आरोपी पकडण्यात यश आले असून अद्यापही दोन आरोपी फरार आहेत. तसेच यातील दोन मुख्य आरोपींना जामीन मिळाला असून उर्वरित आरोपी हर्सूल कारागृहात आहेत.