आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुमेहींनी साखरच नव्हे, तेलापासूनही दूर राहणे नितांत गरजेचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मधुमेह झाला म्हणजे भात आणि बटाटे खाऊ नये किंवा गुलाबजाम अन् रसमलाईचा तर विचारही डोक्यात आणू नये, असा सर्वमान्य समज आहे. पण हा अतिरेकीपणा आहे. हे सर्व पदार्थ प्रमाणात खाण्यास मुळीच हरकत नाही. मात्र, त्यानंतर तुलनेने अधिक चालणे किंवा व्यायाम करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे मधुमेहींनी साखरेपासूनच नव्हे तर तेलापासूनही दूर राहणे नितांत गरजेचे आहे, असा सल्ला राष्ट्रीय मधुमेह तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण बाळ यांनी दिला.
नुकत्याच शहरात झालेल्या मधुमेहातील पायांचे विकार या विषयावर आयोजित परिषदेला बाळ यांची उपस्थिती होती. “दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी काही महत्त्वपूर्ण बाबींकडे लक्ष वेधले. डॉ. बाळ म्हणाले की, आपली खाण्याची अन् राहण्याची पद्धत बदलल्यामुळे मोठी लोकसंख्या मधुमेही झाली. उपचार, औषधे आणि संशोधनातून मधुमेह नियंत्रित ठेवता येईल; पण प्रतिबंध करायचा असेल तर या आजाराला समजून घेत जीवनशैलीत बदल करून घेणे हा एकमेव पर्याय आहे. छोटी वाटी भात किंवा एक चमचा बटाटा भाजी खाण्यास मुळीच हरकत नाही; पण जेव्हा हे खातो तेव्हा रोजच्या पेक्षा एक-ूदोन किलोमीटर अधिक चालत जावे किंवा १५ मिनिटे अधिक व्यायाम करून समतोल साधावा. आहारातील एखादा पदार्थ कायमचा वर्ज्य करण्याची गरजच नाही. प्रत्येक पदार्थात निसर्गाने काही सत्त्व भरले आहे. त्याची शरीराला गरज आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

कुटुंबाला हवे फक्त दीड लिटर तेल
मधुमेह झाला म्हणजे साखर पूर्णपणे बंद केली जाते; पण तेलाच्या वापराकडे कुणाचेच लक्ष नाही. मधुमेह असलेल्यांना भाजी किंवा थेट अशा दोन्ही स्वरूपात मिळून दिवसभरात चमचा तेलच पोटात जायला हवे. तेलाचा बेसुमार वापर हेदेखील मधुमेहाचे अप्रत्यक्ष कारण आहे. तेलामुळे रक्तातील चरबी अन् परिणामी शरीराती चरबी वाढत जाते. यातून आलेला स्थूलपणा मधुमेह आकर्षित करतो. एका कुटुंबात फक्त ते दीड लिटर तेलच महिन्याकाठी वापरले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...