आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळद फिटण्याआधीच नवविवाहित तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथील नवविवाहित तरुणाने लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि. ५) पहाटे सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

अंकुश सुखदेव वाकेकर (२४, बोरगाव कासारी, ता. सिल्लोड) हा पहाटे सहा वाजेच्या सुमारास घरातून शेताकडे गेला. काही वेळाने अंकुशने त्याचा चुलत भाऊ दीपक वाकेकरला ‘मी शेताकडे आलो आहे, मला पाहायला या’ असे मोबाइलवरून सांगून फोन बंद केला. नातेवाइकांनी परत फोन केला. मात्र, अंकुश फोन घेत नसल्याने  त्यानंतर नातेवाइकांनी शेतात धाव घेतली असता तलवाडा शिवारातील शेतातील गट क्रमांक ३६ मध्ये बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. अंकुशचा गुरुवारी (दि. ४) फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील बाबू दशरथ सोनवणे यांची मुलगी सुनीता (२०) हिच्याशी मोठ्या थाटात विवाह सोहळा संपन्न झाला. सर्व नातेवाइकांनी नवविवाहित सुनीताला सासरी पाठवले. सुनीताची व अंकुशची हळदही धुतली नाही. दरम्यान, पहाटे ही दु:खद घटना कळताच आनंदाच्या वातावरणावर शोककळा पसरली असून या घटनेने बोरगाव कासारी व उमरावती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंकुशला सिल्लोड येथील  उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
 
वधुपित्यावर मृत्यूने कोसळला दु:खाचा डोंगर  
गुरुवारी अंकुश व सुनीताचा विवाह पार पडला. मात्र, लग्नाच्या दिवशी सुनीताला सासरी पाठवल्यानंतर सुनीताची लहान बहीण कोमल सोनवणे (१२) हिचा रात्री ७ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने मृत्यू झाला. एका मुलीला सासरी पाठवले. परंतु, दुसऱ्या मुलीवर अंत्यसंस्कार करावे लागले. त्यातच सुनीताच्या नवऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद  माहिती मिळताच वधुपिता बाबू सोनवणेंसह कुटुंबीयांवर आणखीनच दुःखाचा डोंगर कोसळला.
 
पुढील स्लाइडवर वाचा, भरधाव ट्रक अंगावरून गेल्याने युवकाचा मृत्यू...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...