आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाचा संशयास्पद मृत्यू, विष पिण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विषप्राशनामुळे३५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत मृताच्या आई-वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मृताच्या पत्नीने तिच्या घरच्यांनी त्याला विष पिण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. संजय रामनाथ भिसे(३५ रा. इटखेडा) असे मृताचे नाव आहे.

इटखेड्यातील संजय रामनाथ भिसे याचे २००८ मध्ये संगीताशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा मुलगी आहे, परंतु दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. त्यामुळे संगीताने संजय त्याच्या आईवडिलांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात छळाची तक्रार दिली होती. दरम्यान या घटनेनंतर संगीता संजय या दोघांनी घटस्फोटासाठी न्यायलयात अर्जही केला होता. नंतर संजयने संगीतासोबत संसार करण्याचे न्यायालयासमोर मान्य केले. संगीताने पुन्हा सासरी जावे असे आदेश कोर्टाने दिले. १० ऑगस्ट रोजी संजय तिच्या घरी गेला. मात्र त्या ठिकाणी त्याला अपमानित करण्यात आले. त्यामुळे त्याने रागाच्या भरात विष प्राशन केले, असे तक्रारीत म्हटले आहे.

संजयला एमजीएममध्ये दाखल केले. तेथे त्याची प्रकृती जास्त खालावल्याने मंगळवारी रात्री घाटीत दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे संजयचा मृत्यू झाला, असे तक्रारीत म्हटले आहे.