आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावरवाडीत गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड- राहत्या घरी गळफास घेऊन ५६ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे सोमवार दि. फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे.
 
या घटनेविषयी सविस्तर वृत्त असे की, पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील रहिवासी सुदाम नामदेव दिवट्टे (५६ वर्षे) हे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कामासाठी गेले होते. दोन तीन दिवसांपूर्वी ते आपल्या दावरवाडी गावी तुरीचे खळे करण्यासाठी आले होते, परंतु सोमवार दि. फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास कोणाला काही एक सांगता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

या घटनेची माहिती नातेवाइकांना कळताच पाचोड पोलिस स्टेशनचे सपोनि महेश आंधाळे यांच्याशी संपर्क करून या घटनेची माहिती देण्यात आली असून पाचोड पोलिस स्टेशनचे पो. कॉ. महादेव निकलजे, संजय चव्हाण आदींनी पंचनामा केला. मात्र आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही. 
बातम्या आणखी आहेत...