आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाचा तडाखा : तहसील कार्यालयाचे कामकाज सकाळी ९ वाजतापासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिनाभरात दोन वेळा अवकाळीच्या शिडकाव्यानंतरही पारा ४० ते ४२ दरम्यान स्थिर असल्याने ग्रामीण भागात जनजीवनावर परिणाम झाला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे पर्यटन, व्यवसाय, शेतीकामावर परिणाम झाला आहे. तर खुलताबादेत तहसीलमध्ये दुपारी उन्हामुळे येणे नागरिक टाळत असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी तहसील कार्यालय सकाळी दहाऐवजी नऊ वाजेपासून सायंकाळी पाचऐवजी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती खुलताबादचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिली. होलिकोत्सवानंतर उन्हाचा पारा चढू लागतो. परंतु यंदा उत्सवानंतर आठवडाभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने ४० चा पारा गाठला. त्यानंतर दोन वेळा अवकाळीचा शिडकावा झाला. परंतु याचा वातावरणावर फारसा परिणाम पडला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून तर पारा ४० अंशांवर स्थिर असल्याने ग्रामीण भागात उद्योग व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, पर्यटन, व्यवसाय व शेतीकामावरही परिणाम; तापमान
४१ अंशांवर