आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: सॉरी मम्मी म्हणून घेतला गळफास, जलतरणपटूची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भोईवाडा परिसरातील उदय कॉलनीत राहणाऱ्या जलतरणपटूने घराजवळील उद्यानात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. पंकज भास्कर मुंढे (२५) असे त्याचे नाव आहे.
 
पंकज काही दिवसांपासून पोटदुखीच्या आजाराने त्रस्त होता. सोमवारी पहाटे वाजेच्या सुमारास घराजवळील उद्यानात लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पंकजला घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेले. त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यात पोटाच्या आजाराला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. सॉरी मम्मी असे लिहिले आहे. दरम्यान, पंकज हा जलतरण प्रशिक्षक होता. त्याने पुणे आणि चंदिगड येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. 

दोन वर्षांपूर्वी तो एमजीएममध्ये लाइफ गार्ड म्हणून काम करत होता. तसेच पोलिस भरतीची तयारीही करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याला एक लहान भाऊ असून तो बारावीत शिक्षण घेतो. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...