आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत स्वाइन फ्लूमुळे तरुणीचा मृत्यू, चार महिन्यांत स्वाइन फ्लूने घेतला 15 जणांचा बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वाइन फ्लूमुळे ज्योतीनगरातील तरुणीचा घाटीत मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत औरंगाबादेत स्वाइन फ्लूने १५ जणांचे बळी घेतले आहेत. 
 
ज्योतीनगरातील स्नेहल केदार मिणियार (२६) हिला दिवसांपूर्वी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डाॅक्टरांनी तपासण्या केल्या. तिला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट होताच उपचारही सुरू करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने बुधवारी सायंकाळी घाटीत दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना पहाटे वाजता तिचा मृत्यू झाला. तिच्यावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
माजी नगरसेवक गिरिजाराम हाळनोर म्हणाले की, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयश्री कुलकर्णी यांच्या कानावर ही घटना टाकली असून योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांना सांगितले आहे. 
 
जिल्हाधिकारी डाॅ. निधी पांडे म्हणाल्या की, जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत औरंगाबादेत स्वाइन फ्लूने १५ जणांचा मृत्यू झाला. त्यात जण औरंगाबाद जिल्ह्यातील असून रुग्ण बाहेरगावचे आहेत. आतापर्यंत ३१५० जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी ४५ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून इतरांवर उपचार सुरू आहेत. याशिवाय शहरातील रुग्णालयांनाही तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...