मुंबई - राज्यात स्वाईन फ्लूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. चार दिवसांत तब्बल दहा जणांचा मृत्यू झाला आहे. 2017 च्या सुरूवातीच्या साडेचार महिन्यांत स्वाईन फ्लूने 181 जणांचे बळी घेतले. तर, एप्रिल महिन्यापर्यंत 933 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली होती.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांपैकी 563 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. 132 जणांवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार सूरू आहे. अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालकांनी दिली आहे. घरगुती उपचार न करता त्वरित दवाखान्यात जाण्याचे आवाहनही केले.
औरंगाबादमध्ये ‘स्वाइन फ्लू’तून बरे झालेल्या रुग्णाचा जंतुसंसर्गामुळे मृत्यू...
पुंडलिक नगर भागात राहाणाऱ्या संजय पहाडे या ४२ वर्षीय इसमाचा सोमवारी मध्यरात्री कमलनयन बजाज रुग्णालयात मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी स्वाईन फ्लूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतेे. त्यातून ते बरे झाले; मात्र नंतर जंतू संसर्ग झाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल रोजी संजय पहाडे यांना कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले. या आजारातून ते बरेही झाले होते. मात्र, उपचारादरम्यान लावण्यात आलेल्या कृत्रिम श्वासोच्छवासात जंतुसंसर्ग झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, याविषयी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शमीम अहेमद खान यांच्याशी संपर्क साधून रुग्णालयाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पहाडे यांच्या मृत्यूबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. आम्ही रुग्णाची सर्व माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना दिली असून याविषयावर त्यांच्याशीच बोला, असा सल्ला त्यांनी दिला. रुग्णालयांमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास अनेक रुग्ण दगावतात, एवढेच त्यांनी स्पष्ट केले.
घाटीत पाच रुग्णांवर उपचार : दरम्यान, घाटी रुग्णालयात स्वाइन फ्लूवरील उपचार घेत असलेल्या ७ रुग्णांपैकी दोन रुग्ण पूर्णपणे बरे हाेऊन घरी परतले आहेत. उर्वरित ५ रुग्णांपैकी २ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून २ जणांचा निगेटिव्ह, तर एका रुग्णावर संशयित म्हणून उपचार सुरू आहेत, असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर वाचा, स्वाईन फ्लू बचावापासून अशी घ्या काळजी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)