आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : छावणीमध्ये स्वाइन फ्लूमुळे महिलेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्वाइनफ्लूमुळे फेब्रुवारीला सय्यद नसरीन साजेद अली (४०) या परभणीच्या महिलेच्या मृत्यूनंतर १६ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वाजता छावणीत कांताबाई माणिक भालेराव (५०) यांचाही मृत्यू झाला. येथील मोहम्मदिया मशिदीजवळ कांताबाई राहत होत्या. १५ फेब्रुवारीला त्यांना घाटीत दाखल करण्यात आले होते, अशी माहिती अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी दिली. 
 
दोन वर्षांनंतर स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या आजाराची लक्षणे सामान्य फ्लूप्रमाणे आहेत. घसा खवखवणे, सर्दी, डाकेदुखी अशी लक्षणे यामध्ये दिसून येतात. शब्बीर मुस्तफा हुसेन या बँक कर्मचाऱ्याची २१ जानेवारी २०१५ ला स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात हा आजार मोठ्या वेगाने फोफावला होता. 

स्वाइन फ्लू : एनएच विषाणूंची लागण झाल्याने स्वाइन फ्लू होतो. पहिल्या तीन दिवसांत रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांना याची लागण झपाट्याने होते. हा आजार श्वसनयंत्रणेवर आघात करून तिला निकामी करतो. रोगप्रतिकारकशक्ती उत्तम असेल तर लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. यासाठी दैनंदिन अन्नघटकाकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...