आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबाद शिक्षक मतदारसंघात चुरस: विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विधान परिषदेच्या ५ जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे.  ६ फेब्रुवारीस निकाल जाहीर होतील. गृहराज्यमंत्री रणजित पाटलांसह ७६ उमेदवार रिंगणात असून यात मुदत संपलेल्या पाचही माजी आमदारांचा समावेश आहे.  पराभव झाल्यास मंत्रिपदावरून गच्छंती अटळ असल्याने पाटलांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. 

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, नागपूरचे नागो गाणार, कोकणचे रामनाथ मोते, अमरावती पदवीधर मतदारसंघाचे रणजित पाटील व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सुधीर तांबे यांची मुदत संपल्याने ही द्वैवार्षिक निवडणूक होत अाहे.
बातम्या आणखी आहेत...