आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांच्या वेतनासाठी असणार स्वतंत्र कक्ष- शिक्षणाधिकारी मोगल यांनी केली घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षकांच्या वेतन विलंब इतर प्रलंबित प्रश्नी शिक्षणाधिकारी मुख्य लेखा वित्त अधिकारी यांची भेट घेऊन ‘प्रश्न जाहले उदंड’ , आता प्रश्न सुटलाच पाहिजे, असे निवेदन दिले. शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांची प्रथम भेट घेऊन पगार प्रश्नावर आज तोडगाच हवा, अशी भूमिका घेतली. यानंतर शिक्षणाधिकारी शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने थेट मुख्य लेखा वित्त अधिकारी यांची केबिन गाठून वेतन विलंब प्रश्नात येणारे अडथळे समजून घेतले.
 
 या वेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी तब्बल एक तास चर्चा करून शिक्षकांचे वेतन शिक्षण विभागाकडूनच शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याची जबाबदारी असल्याचे निदर्शनास आणून दिले.
 
यानंतर यापूर्वी ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात स्वतंत्र कक्ष तयार केला होता, त्याचप्रमाणे शिक्षण विभागाकडून तात्काळ हा स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्याद्वारे शिक्षणाधिकाऱ्यांच्या खात्यातून थेट शिक्षकांच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात वेतन जमा केले जाईल याची खात्री शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक सेनेला दिली.
 
या निर्णयामुळे शिक्षक सेनेच्या वतीने समाधान व्यक्त केले या वेळी शिक्षण सभापती विनोद तांबे, खाजेकर साहेब, कोटगिरे तसेच शिष्टमंडळात शिक्षक सेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रभाकर पवार, जिल्हाध्यक्ष दीपक पवार, जिल्हा सरचिटणीस सदानंद माडेवार, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष आढाव, जिल्हा कोशाध्यक्ष लक्ष्मण ठुबे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश लबडे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पवार, अनिल काळे तालुकाअध्यक्ष अमोल एरंडे,कल्याण पवार, सचिन पोलास,सोमनाथ जगदाळे, सरचिटणीस भगवान हिवाळे, काशीनाथ वसईकर, सचिन एखंडे, चंद्रकांत पालकर, कैलास मिसाळ, लक्ष्मण गलांडे, अमोल शेळके पाटील, बाळासाहेब जगदाळे, दिनेश निकम, शब्बीर शेख, मनोज सोनवणे, शिवाजी कुमावत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
या विषयावरही चर्चा 
पदवीधर वेतन पुनर्निश्चिती वसूली तात्काळ थांबवावी, चटोपाध्याय, स्थाई, शिक्षकांवरील आँनलाईन कामाचा बोजा, वैद्यकीय प्रतिपुर्तीचे प्रस्ताव प्रलंबन, पदोन्नति, गटविमा ३६० रू. कपात करणे, सार्वत्रिक बदल्यांपुर्वी शिक्षक सेनेसोबत बैठक घेऊन विश्वासात घेऊन प्रक्रिया राबवणे इतर प्रलंबित प्रश्नांवरही निवेदन देऊन चर्चा केली. 
बातम्या आणखी आहेत...