आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर फुटल्याने भावी गुरुजींची फेर परीक्षा, प्रत्येक परीक्षा केंद्रावर होणार व्हिडिओ शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- पाच महिन्यांपूर्वी बीडमध्ये टीईटीचा पेपर फुटल्याने शासनाने पेपर रद्द केला. शेवटी मंगळवार या दिवशी परीक्षेसाठी तारीख जाहीर झाली. बीडमध्ये ही परीक्षा निर्विघ्नपणेे पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेने तगडा पोलिस बंदोबस्त लावला. या शिवाय प्रत्येक केंद्रावर व्हिडीओ शूटिंग, उमेदवारांची झडती घेण्यात आली. औरंगाबादच्या येथील उपसंचालकांनी बीडमध्येच दिवसभर तळ ठोकला. आणि अधिकाऱ्यांनी वारंवार परीक्षा केंद्रांना भेटी दिल्याने परीक्षा शांततेत पार पडली.

१६ जानेवारी २०१६ रोजी बीड शहरात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटून त्याची उत्तरे व्हॉट‌्सअॅपवर गेली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पेपर फुटल्याचे सिद्ध होताच राज्य शासनाने राज्यातील हा पेपर रद्द करून मंगळवार जून २०१६ रोजी एकाचवेळी ही परिक्षा घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या परीक्षेच्या प्रश्न पत्रिका कडेकोट बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालयातील कोशागार कार्यालयात ठेवण्यात आल्या होत्या. परीक्षेच्या तयारीसाठी चार केंद्रांसाठी एका नायब तहसीलदारांची झोनल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. समावेशक, पर्यवेक्षक, लिपिक केंद्र संचालक यांची निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी बैठक घेत परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे आदेश दिले होते. बीड शहरातील २९ केंद्रावर ही परीक्षा देण्यासाठी हजार ५७३ भावी शिक्षकांनी अर्ज केले होते. मंगळवारी सकाळी साडेदहा ते एक या वेळेत ५९६९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तब्बल १६०४ शिक्षकांनी या परीक्षाकडे पाठ फिरवली आहे.पाच महिन्यांपूर्वी पेपर फुटीचे प्रकरण ताजे असल्याने जिल्हा परिषदेने ही परीक्षा जागरूक पद्धतीने हाताळली.

या साठी परीक्षेसाठी बीडशहर, पेठबीड, शिवाजीनगर बीड ग्रामीण ठाण्याचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. या शिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हिडीओ शूटिंग करण्यात आली.

उपसंचालक तुपे बीडमध्ये तळ ठोकून
बीडमध्ये मंगळवारी शिक्षक पात्रता परीक्षा असल्याने उपसंचालक भाऊसाहेब तुपे हे निरीक्षक म्हणून बीडमध्ये आले होते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांनी बीडमध्ये दिवसभर तळ ठोकला होता.

बीडशहरात टीईटीच्या २९ परिक्षा केंद्रावर सकाळी साडेदहा वाजता पेपरला सुरूवात झाली तेंव्हा प्रत्येक परिक्षार्थीची झडती घेवुन त्याला आत पाठण्यात येत होते. मोबाईल वापरला बंदी घालण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी वारंवार परिक्षा केंद्रांना भेटी दिल्या.

तीन केंद्रांवर भेटी
बीडशहरातील २९ केंद्रावर मंगळवारी शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात आली दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी बलभीम महाविद्यालयातील दोन मिलीया महाविद्यालयातील एक अशा तीन केंद्रांना भेट देवुन तपासणी केली.
बातम्या आणखी आहेत...