आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सा. बां. म्हणते खड्डा नाही, हा घ्या पुरावा, आश्वासन अपूर्ण राहिल्यानेच पुलावर पुन्हा होताहेत अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुलावर असा धोकादायक खड्डा आहे. - Divya Marathi
पुलावर असा धोकादायक खड्डा आहे.
औरंगाबाद - सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर पुन्हा एकदा खड्ड्यात अडकून एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. पावसाळा संपताच हा खड्डे आणि खराब भाग दुरुस्त केला जाईल, असे आश्वासन देणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर डीबी स्टारने प्रकाश टाकला. त्यावर पुलावर खड्डाच नसल्याचा दावा विभागाचे अधिकारी करत आहेत. त्यामुळे चमूने पुन्हा एकदा पाहणी करून त्याचा पुरावाच गोळा केलाे आहेत. या खड्ड्यात दुचाकीचे चाक फसते आणि वाहन पडते. त्यात मागून येणारे वाहन धडकते, पण एवढे होऊनही विभाग जागा व्हायला तयार नाही. 
 
सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर अगदी उतारावर जीवघेणे खड्डा पडला होते. वेग वाढलेला असतानाच खड्डे आल्याने अचानक ब्रेक लावले जातात. यामुळे मागून येणारी वाहने धडकण्याचे प्रकारही सातत्याने होत होते. अधिकारी मात्र हायग्रेड डांबरच उपलब्ध नसल्याचे क्षुल्लक कारण देत ठेकेदारांचा बचाव करत होते. यावर डीबी स्टारने तपासचक्र सुरू करताच खड्डे बुजवण्यात आले. मात्र, कामाला दर्जाच नव्हता. दुसरीकडे या कामासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवताच सब ठेकेदार नेमल्याचे तपासात उघड झाले. शिवाय ज्या मूळ ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. त्याचा दोष निवारण कालावधी आठ वर्षांचा होता. यावर डीबी स्टारने ‘सेव्हन हिल्स उड्डाणपुलावर ऐन उतारावरच जीवघेणे खड्डे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यावर सब ठेकेदाराने निकृष्ट काम झाकण्यासाठी तातडीने एेन उतारावरचे खड्डे डांबराने भरले. मात्र, कामाचा सुमार दर्जा असल्याने चार महिन्यांतच एक दोन खड्डे उघडे पडले. तेही धोकादायक. 

खड्डाच नसल्याचा कांगावा 
या रस्त्याचे काम पावसाळ्यानंतर पूर्ण करू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते, पण त्याला महिने उलटले तरी हे काम झालेले नाही. पुन्हा एखादा आठवण करून दिली असता पाहणी करून दोन दिवसांत काम सुरू करतो असे अधिकारी म्हणाले. पण कालच सकाळी खड्ड्यात एक दुचाकीस्वार अडकला. त्यातच त्याला पाठीमागून एका चारचाकीने धडक दिली. पण एवढे होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आता मात्र पुलावर खड्डाच नसल्याचा दावा करत आहे. 
आम्ही पाहणीकेली आहे. त्यात कुठेही खड्डा नसल्याचे आम्हाला दिसले. पुलाची परिस्थिती चांगली आहे. लोकांना काहीही त्रास नाही. एम.ए. मुजीब, उपविभागीयअभियंता 
बातम्या आणखी आहेत...