आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ : बड्यांसाठी हेलिपॅडची व्यवस्था, सामान्यांसाठी बसस्थानकही नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीड किमी अंतरावर चार ठिकाणी थांबे आहेत. सहलीच्या बसेस रस्त्यावर थांबतात. - Divya Marathi
दीड किमी अंतरावर चार ठिकाणी थांबे आहेत. सहलीच्या बसेस रस्त्यावर थांबतात.
वेरूळ - ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनामुळे जगाच्या नकाशावर असलेल्या वेरूळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गालगत सुमारे तीन एकर जागा बसस्थानकासाठी दिलेली असताना अद्याप बसस्थानकाचा मुहूर्त लागला नाही. लेणी ते गावादरम्यान जेथे कुणी हात दाखवेल तेथे चालकाला बस थांबवावी लागत असल्याने नेमका थांबा कुठे आहे व प्रवाशांसह ग्रामस्थांनी कोठे बससाठी उभे राहावे हा मोठा गंभीर प्रश्न आहे. वेरूळ येथे मोठ्या  कार्यक्रमानिमित्त हेलिपॅडची सोय करण्यात आली असून काम अंतिम टप्प्यात आहे.  मात्र, अद्याप जागा असूनही  बसस्थानक झाले नाही हे मोठे दुर्दैव म्हणावे लागले. येथे आता मोठ्या प्रमाणावर विकासकामांना प्रारंभ झाला असून यात बसस्थानक व्हावे अशी मागणी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या ध्यानीमनी नसल्याचाच हा प्रकार समोर येत आहे. वेरूळ येथे बसस्थानक व्हावे यासाठी ग्रामपंचायतीने अनेक वेळा ठराव घेऊन पाठपुरावा केला तसेच स्थानिक संघटनांनी निवेदनाद्वारे मागणी केली, परंतु या मागणीला अद्याप यश आले नाही.  
 
ऐतिहासिक- धार्मिक वारसास्थळ 
वेरूळ येथे जगप्रसिद्ध लेणी, बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिर, श्री संत जनार्दन स्वामी आश्रम, ऐतिहासिक शिवालय तीर्थ, मालोजीराजे भोसले स्मारक, श्री दत्त टाका स्वामी आश्रम, लक्षविनायक गणपती मंदिर यासह अनेक ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळे असल्याने येथे नेहमी हजारो पर्यटक, भाविक येत असतात. 
 
साधारण दीड किमीमध्ये चार थांबे 
सोलापूर - धुळे महामार्गावरील वेरूळ पर्यटनस्थळाला हक्काचे बसस्थानक नसल्याने वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, शिवालय तीर्थ व भोसले चौक असे एकूण चार थांबे साधारण दीड किमी अंतरात आहेत.  पर्यटक-भाविकांना कोठे थांबावे व बसचालकानेही नेमके कोणत्या थांब्यावर बस थांबवावी, असा संभ्रम नियमित होतो. 
 
का झाले नाही बसस्थानक? 
ग्रामपंचायतीने वेळोवेळी ठराव घेऊन ते महामंडळाकडे दिले, परंतु महामंडळाने 
कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अखेर ग्रामपंचायतीने थेट परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले. परंतु तेथेही दाद न मिळाल्याने अद्याप जागा असून बसस्थानकाचे भिजत घोंगडे आहे. 
 
बसस्थानक मध्यवर्ती ठिकाणी व्हावे
लेणी ते भोसले चौक साधारण दीड किमी अंतर असून लेणीसमोरील जागेवर बसस्थानक झाल्यास रात्रीच्या वेळी पर्यटक, ग्रामस्थांना अडचणी येतील. त्यामुळे ग्रामस्थांचा लेणीसमोर बसस्थानकास नेहमीच विरोधात राहिला आहे. हेच बसस्थानक वेरूळ लेणी ते गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी व्हावे, अशीच मागणी ग्रामस्थांची आजही आहे.    
 
बसस्थानकासाठी प्रयत्न सुरू  
- वेरूळ येथे असलेली आमची जागा वनोद्यान व बॅटरी बस मार्गास देण्यात आल्याने एमटीडीसी आता आम्हाला पर्यायी जागा देत असून यासंदर्भात बैठक होऊन कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. यानंतर तातडीने बसस्थानक मंजुरीचे प्रयत्न असून या आधी का नाही 
झाले याची नक्की कारणे आम्हाला माहीत नाहीत.
-आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, 
 
परिवहनमंत्र्यांकडे पाठपुरावा
- परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना मी व ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड यांनी मंत्रालयात जाऊन ग्रामपंचायतीचे पत्र दिले आहे. यामध्ये सुसज्ज बसस्थानक व्हावे, सर्व प्रकारच्या बसेस येथे थांबाव्यात व महाराष्ट्रातील सर्व ज्योतिर्लिंगांस येथून बस असाव्यात, असे मुद्दे आहेत. पत्र देऊन तीन महिन्यांहून अधिक काळ झाला, परंतु काही उत्तर नाही. 
- महेंद्र दगडफोडे, उपसरपंच पती
 
पुढील स्लाईडवर वाचा, सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)  
बातम्या आणखी आहेत...