आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड कोटीच्या रॉयल्टीपोटी १० कोटींचा पूल नष्ट, बीडच्या जिल्हाधिका-यांनी दिले चौकशीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पैठण तालुक्यातील आपेगावजवळ गोदावरी नदीवरील पूल अचानक खचला. रॅफ्ट फाउंडेशनने उभारलेला पूल पन्नास ते सत्तर वर्षे टिकण्याऐवजी बारा वर्षांतच कोसळला ! बीड जिल्हािधका-यांनी या प्रकाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली असली तरी केवळ दीड ते दोन कोटींच्या वाळू महसुलाच्या मोहात आजच्या किमतीत दहा कोटींचा पूल ढासळला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पैठण उपविभागांतर्गत १९९८-९९ मध्ये गोदावरी नदीवर पैठण तालुक्यातील आपेगाव आणि गेवराई (जि. बीड) तालुक्यातील कुरणपिंप्री यांना जोडणा-या पुलाच्या उभारणीचे काम सुरू झाले. त्या वेळी सुमारे चार कोटी रुपये या प्रकल्पाची किंमत होती. पुणे येथील मनोजा स्थापत्य कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. २००१-०२ मध्ये पूल उभारणीचे काम पूर्णही झाले आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पूल उभारताना रॅफ्ट फाउंडेशन १.८० ते २.४० मीटरचा साधारणत: नऊ इंच रुंदी आणि सहा ते आठ फूट उंचीचे आरसीसी रॅफ्ट टाकले जातात. गोदावरी नदीपात्रात अगदी खोलपर्यंत मातीचा ओलेपणा लागला नाही. त्यामुळे संपूर्णत: वाळूमध्येच हे रॅफ्ट टाकण्यात आले. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंनी बांधकामाजवळ किमान दहा ते पंधर फूट परिसरात वाळू उपसा न झाला तरच पुलाला कोणताही धोका उद्भवत नाही. परंतु आपेगाव आणि कुरणपिंप्री या औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांनी पुलाचा जीव घेतला.

वास्तविक पाहता रॅफ्टचे पूल किमान पन्नास ते सत्तर वर्षे टिकतात. परंतु या पुलालगतच्या पट्ट्यात केवळ वाळूच असूनही तत्कालीन तहसीलदारांनी या वाळूपट्ट्यातून बेसुमार वाळू उपसा रोखण्याचे धाडस केले नाही आणि वाळूतून मिळणा-या दीड ते दोन कोटींच्या महसुलापोटी आजच या किमतीतील दहा कोटींचा पूल खचला, अशी मािहती बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली.