आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महंत पांगारकरांच्या पुन्हा चाैकशीचे संकेत, नाेटांच्या अधिकृत मालकाचा शाेध सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाेटा अदलाबदलप्रकरणी महंत सुधीरदास पुजारी अाणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांची दाेन दिवस चाैकशी केल्यानंतर त्यांना पुन्हा अावश्यकतेनुसार चाैकशीस बाेलावले जाणार असल्याचे संकेत अायकरच्या अधिकाऱ्यांनी दिले. संशयित दाेघांसह कांदा व्यापाऱ्याकडून त्यांचे अार्थिक व्यवहार तपासले जात असतानाच छाप्यात जप्त लाख ७० हजारांच्या नाेटांचे नेमके मालक काेण, या नोटा काेणाच्या खात्यातून अाणि काेणत्या बँकेतून वितरित झाल्या, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांचे जाबजबाबही नाेंदविले जाणार असल्याची माहिती अायकरच्या सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
शहरातील एका हाॅटेलमध्ये
रविवारी (दि. ११) रात्री नाेटा बदलाचा प्रकार अायकर विभागाच्या सहअायुक्त अाणि उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून उघडकीस अाणला. या प्रकरणात अायकरच्या पथकाने महंत सुधीरदास पुजारी अाणि पांगारकर या दाेघांची सलग चार तास चाैकशी करून त्यांना साेडून दिले. त्यापाठाेपाठ या दाेघांसह कांदा व्यापारी लुंकड यांची मंगळवारी (दि. १३) चाैकशी करीत त्यांचे तीन वर्षांचे अायटी रिटर्न्स, बँक खात्याचे विवरणपत्र जमा करून घेण्यात आले. दरम्यान, त्या हाॅटेलमधील छाप्यात काेट्यवधी नव्हे तर केवळ लाख ७० हजारांची रक्कम जप्त केल्याचे तसेच या नव्या नाेटा अामचे मित्र लुंकड यांच्या असून त्या रकमेशी अामचा काहीही संबंध नसल्याचा दावा चाैकशीनंतर पुजारी पांगारकर यांनी पत्रकारांसमाेर केला हाेता. विलास पांगारकर यांनी चाैकशीनंतर अायकर विभागाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विभागाने छापा टाकला त्यावेळी काही लाेक पळून गेले होते. तसेच पथकाने नाेटा असलेल्या दाेन बॅगाही ताब्यात घेतल्या हाेत्या. त्यामुळे त्यांनी ताब्यात घेतलेल्या या नाेटा गेल्या कुठे असा सवाल उपस्थित केला हाेता. यासंदर्भात, बुधवारी (दि. १४) अायकर विभागाचे सहअायुक्त उपसंचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघेही सुट्टीवर असल्याचे सांगण्यात अाले. तर याच तपासी पथकातील अधिकाऱ्याने संशयितांच्या अाराेपांवर वरिष्ठ अधिकारी स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगत चाैकशी अद्याप अपूर्ण असून, त्यांना पुढील अाठवड्यात पुन्हा बाेलावले जाणार असल्याचे सांगण्यात अाले.
छाप्यातील नोटांंची सखोल माहिती काढणार
पथकाने संशयित तिघांची कसून चाैकशी केल्यानंतर अाता छाप्यात ज्या नव्या दाेन हजाराच्या नाेटा सापडल्या अाहेत, त्याच्या क्रमांकावरून त्या काेणत्या बँकेतून वितरीत झाल्या अाहेत? त्याचा नेमका मालक काेण? त्यासह एकाच व्यक्तीच्या नावे ही रक्कम वितरित झाली का? यासर्व बाबींचा अायकर विभाग तपास करीत अाहे. या नाेटांविषयी गरज पडल्यास संबंधित बँकेच्या अधिकाऱ्याची चाैकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...