आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण, ऊसतोड कामगारांच्या मुलीची कर्नाटकातून सुखरूप सुटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - कर्नाटकातील मुधोळ गावी ऊसतोडीसाठी गेलेल्या कासोडा (ता. गंगापूर) येथील मोरे कुटुंबातील अल्पवयीन मुलीची सुटका वाळूज एमआयडीसी पोलिसांनी केली असून अपहरणप्रकरणी मुकादम दिलीप जाधव (२७, रा.जिल्हा परिषद क्वार्टरलगत, जालना) आणि भारत सोनवणे (२४, रा. मिटमिटा, औरंगाबाद) या दाेघांना अटक केली. अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होताच तपासाची चक्रे फिरवत पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी कर्नाटकात पाठवलेल्या टीमने मुकादमाच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली. मुलीचा भाऊ एक दिवस अगोदर मुकादमाच्या हातावर तुरी देऊन निसटला.
मुकादम दिलीप जाधव (२७, रा. जिल्हा परिषद क्वार्टरलगत, जालना) भारत सोनवणे (२४, रा.मिटमिटा, औरंगाबाद) या दोघांनी दसऱ्यानंतर कासोडा (तालुका गंगापूर) येथील संजू गंगाधर मोरे (३६) त्याची पत्नी अलका मोरे (३२) यांच्यासह विविध ठिकाणच्या नऊ जोडप्यांना ऊसतोडीसाठी कर्नाटकातील मुधोळ येथील निरानी साखर कारखान्यावर नेले होते. उचल आणि चांगल्या मजुरीच्या आमिषामुळे ही कुटुंबे ऊसतोडीसाठी गेली होती. सुरुवातीला चांगली वर्तणूक देणाऱ्या मुकादमाकडून नंतर मात्र उपाशीपोटी काम करून घेतले जात होते. मजुरी देण्यासही टाळाटाळ करण्यात येत होती. या प्रकाराला कंटाळलेल्या मोरे दांपत्याने मुकादमाच्या कचाट्यातून निसटण्याचा बेत आखला. मात्र जवळ पैसे नसल्यामुळे जाणार कसे हा प्रश्न होता. त्यावर उपाय शोधत, कधी पायी तर कधी मोफतचा रेल्वे प्रवास करीत, वाटेत मिळेल ते मागून खात ३० नोव्हेंबर रोजी कर्नाटकातून निघालेले मोरे पती-पत्नी अखेर डिसेंबर रोजी औरंगाबाद, कासोडा येथे पोहोचले. दरम्यान, मुलगी आजारी असल्याने मुकादम जाधवचा साथीदार भारत मिटमिट्याला आला होता. तिकडे, मोरे दांपत्य निसटल्याचे कळताच, भारत अन्य एकाने मोरे दांपत्याचा कर्नाटकात अपघात झाल्याची मोरेच्या आईला थाप मारून तिच्याजवळून अल्पवयीन मुलामुलीला मुधोळला घेऊन गेले. ही गोष्ट संजू मोरेच्या आईने त्याला गावी आल्यानंतर सांगितली. यामुळे घाबरलेल्या संजू मोरेने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून आरोपींविरोधात दोघा अल्पवयीन मुलांच्या अपहरणाची तक्रार दिली.

कर्नाटकात जाऊन पोलिस पथकाने मुकादम दिलीप जाधव यास अटक केली, तर औरंगाबाद येथून त्याचा साथीदार भारत सोनवणेला अटक केली. दोघांविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांत अपहरणासह बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली.

पथकाकडून मुलीची सुटका
पोलिस निरीक्षक नाथा जाधव यांनी पाठवलेले फौजदार गौतम खंडागळे, जमादरी वसंत जिवडे, दाभाडे यांचे पथक डिसेंबर रोजी सकाळी कर्नाटकातील मुधोळला पाेहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुकादमाची टोळी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी छापा मारून त्यांच्या ताब्यातून संजू मोरेच्या अल्पवयीन मुलीची सुटका केली. तिचा भाऊ पूर्वीच मुकादमाच्या तावडीतून निसटल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

मुकादमाला गुंगारा
मुकादमाकडे ओलीस असणाऱ्या बहीण-भावांकडून मुकादम अन्नपाणी देता काम करून घेत होता. भावाने बहिणीकडे, कानातील सोन्याच्या काड्या मला दे, त्या विक्री करून मी घर गाठतो, नंतर तुला सोडवण्यासाठी आई-वडिलांना घेऊन येतो, असे सांगतले. मात्र, बहिणीने नकार दिला. तरीही, मुकादम कामानिमित्त बाहेर गेल्याची संधी साधून भावाने डिसेंबर रोजी पलायन केले. एका रेल्वेस्टेशनवर त्याने हजाराचा मोबाइल ३०० रुपयांत विकला. एका व्यक्तीने त्याला प्रवासभाडे देऊन सोलापूरपर्यंत सुखरूप पोहोचवले. डिसेंबर रोजी रात्री तो औरंगाबादला पोहोचला.
बातम्या आणखी आहेत...