आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटोदा: जामखेडहून नेकनूरकडे गायी घेऊन जाणारा टेम्पो पकडला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेकनूरकडे जाणारा टेम्पो पकडला तेव्हा टेम्पोमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी, वासरे आढळली. - Divya Marathi
नेकनूरकडे जाणारा टेम्पो पकडला तेव्हा टेम्पोमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या गायी, वासरे आढळली.
पाटोदा - नगर जिल्ह्यातील जामखेड येथून पाटोदामार्गे नेकनूर कत्तलखान्याकडे २० गायी, वासरांना घेऊन जाणारा टेम्पो एक दुचाकी चालकाच्या सतर्कतेमुळे पाटोदा पोलिसांनी बेलवाडी येथे पकडला. या प्रकरणी पाटोदा पोलिस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 
शनिवारी दुपारी जामखेडहून नेकनूरकडे टेम्पो क्र. एम.एच. १० झेड ०७०१ हा भरधाव वेगात निघाला होता. पाटोदा शहराजवळील बेलेवाडी जवळ सदरील टेम्पो आला तेंव्हा थेरला येथील के.एम.राख यांच्या अंगावरच टेम्पो आल्याने ते घाबरले होते. 
 
तेव्हा त्यांनी पाटोदा येथे त्यांच्या काही मित्रांना फोन करून टेम्पो पकडण्यास सांगितले. तेव्हा बेलवाडी येथे नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी टेम्पो पकडला तेव्हा सदरील टेम्पो ताडपत्रीने झाकलेला होता. सदरील टेम्पो पाटोदा पोलिस ठाण्यात नेण्यात आला. 
 
या ठिकाणी टेम्पोवरील ताडपत्री काढली तेव्हा त्यात काही गायी कालवडी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी कांबळे यांना बोलावून गुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. 
 
टेम्पोमध्ये दोन शेळ्या नऊ कालवडी, सहा गायी, दोन बैल, चार वासरं आढळून आली आहेत. या प्रकरणी पोलिस जमादार विष्णू जायभाये यांनी पाटोदा ठाण्यात तक्रारीवरून टेम्पो चालक शेख शकील (रा.भाळवणी ता.आष्टी)याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
 
हनुमानगड गोशाळेत सोडले 
पाटोदा पोलिसांनी सावरगाव घाटजवळील हनुमानगड येथील गोशाळेत गायी सोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव राठोड करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...