आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिन्सीत व्यापाऱ्यांचे घर फोडून 5 तोळे सोने , 1 लाख लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिन्सी भागात राहणाऱ्या फर्निचर व्यापाऱ्यांचे घर फोडल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजता उघडकीस आली. इर्शाद काझी यांच्या मुलाचे रविवारी लग्न झाले . सोमवारी संध्याकाळी जिन्सी भागातील व्हीआयपी फंक्शन हॉलमध्ये रिसेप्शन ठेवले होते. या कार्यक्रमासाठी घरातील सर्व सदस्य कुलूप लावून कार्यक्रम स्थळी आले होते. रात्री ११ च्या सुमारास ते घरी परातले असता दरवाजाची काडी त्याना तुटलेली दिसली. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेे होते. घरात चोरी झाल्याचे कळताच त्यांनी जिन्सी पोलिसांना माहिती दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जिन्सी भागात राहणाऱ्या फर्निचर व्यापाऱ्यांचे घर फोडल्याची घटना सोमवारी रात्री ११ वाजता उघडकीस आली. इर्शाद काझी यांच्या मुलाचे रविवारी लग्न झाले . सोमवारी संध्याकाळी जिन्सी भागातील व्हीआयपी फंक्शन हॉलमध्ये रिसेप्शन ठेवले होते. या कार्यक्रमासाठी घरातील सर्व सदस्य कुलूप लावून कार्यक्रम स्थळी आले होते. रात्री ११ च्या सुमारास ते घरी परातले असता दरवाजाची काडी त्याना तुटलेली दिसली. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेे होते. घरात चोरी झाल्याचे कळताच त्यांनी जिन्सी पोलिसांना माहिती दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.