आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: वाळूज परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 मुली, 3 मुलांसह 1 महिला बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- कामगार वसाहतीसह वाळूज परिसरातील वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तीन मुले, तीन मुली एक महिला असे सात जण बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 

पहिली घटना 
वाळूज महानगरलगतच्या भांगसीमाता मंदिराजवळ स्वामी परमानंदगिरी महाराज ज्ञानमंदिर आश्रमशाळा आहे. त्यालगत शाळेचे वसतिगृह आहे. ही निवासी शाळा असल्याने या वसतिगृहात विद्यार्थी वास्तव्यास आहेत. या वसतिगृहातून नववी दहावीत शिक्षण घेणारे तिघे विद्यार्थी शनिवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले. प्रसाद भारत पांडव (१५,रा.वेरूळ ता.कन्नड वर्ग नववी), नागेश काकासाहेब निकम(१४ रा.पिशोर ता.कन्नड वर्ग नववी), सागर पोपट श्रीखंडे (१५,रा. सलामपुरेनगर, वडगाव कोल्हाटी वर्ग दहावी) अशी बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. घटनेची दौलताबाद पोलिसांनी नोंद घेतली आहे. 

दुसरी घटना 
फेब्रुवारी रोजी रांजणगाव शेणपुंजीतील आसाराम बापू नगरात घडली. येथील भानुदास सिरसाट हे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कंपनीतील कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. सायंकाळी जेव्हा ते कामावरून घरी परतले. तेव्हा पत्नी छाया(३२) मुली संजीवनी(४),पूजा (९)या तिघीही घरी दिसून आल्या नाहीत. इतरत्र शोध घेऊनही त्या तिघीही सापडल्या नाहीत. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनेची सोमवारी नोंद केली आहे. 

तिसरी घटना 
बजाजनगरात ६ फेब्रुवारी रोजी घडली. येथील १२ वी वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिच्या पालकांनी घटनेच्या दिवशी राजे शहाजी महाविद्यालयात दुपारी १२ वाजेच्या सुमारास आणून सोडले होते. सायंकाळी वाजता पुन्हा तिला घेण्यासाठी पालक महाविद्यालयावर गेले. मात्र, विद्यार्थिनी सापडली नाही. पालकांच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा बेपत्ता झालेले मुंल-मुली आणि महिलेचे फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...