आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायगावात दोन मुलींसह महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
खामगाव - सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे दोन मुलींसह महिलेचा विहिरीत बुडून मृत्यु झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास  घडली.  लक्ष्मीबाई (निकिता) प्रल्हाद दाभाडे (२८)श्रद्धा प्रल्हाद दाभाडे(४)व छकुली (४)अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, कायगाव येथील दाभाडे वस्तीवर प्रल्हाद दाभाडे हे पत्नी  लक्ष्मीबाई व दोन्ही मुलींसह राहतात. सोमवारी चारच्या सुमारास ही महिला दोन मुलींसह स्वतःच्या विहिरीकडे गेली असता तिचा विहिरीत पडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या नातेवाइकांनी विहिरीकडे धाव घेतली असता महिला व मुली विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्या. रात्री आठच्या सुमारास या तिन्ही मायलेकींचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदन करण्यासाठी सिल्लोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
सासरच्यांनी मारल्याची नातेवाइकांची तक्रार
मयत लक्ष्मीबाईचे वडील भानुदास मारोती फुके यांनी वडोदबाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार लक्ष्मी हिचे चार ते पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस चांगले वागवल्यानंतर सासरच्यांनी मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. लक्ष्मीबाईला दोन्ही मुली झाल्या.  त्यामुळे सासरच्या लोकांनी मुलीला व दोन लहान मुलींना मारून विहिरित टाकले, असा आरोपही त्यांनी  केला आहे.
बातम्या आणखी आहेत...