आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

176 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे उद्या भूमिपूजन, 6 मंत्र्यांची उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मंठा, जालनापरतूर तालुक्यात समाविष्ट होणाऱ्या १७६ गावांच्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे मंगळवारी भूमिपुजन होत आहे. त्यासाठी परतूर तालुक्यातील रोहिणा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास राज्य मंत्रीमंडळातील सहा मंत्री उपस्थित राहणार आहे. रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. 
याेजनेचे नियोजीत जलशुध्दीकरण केंद्र असलेल्या रोहिणा येथील आय.टी.आय. कॉलेज जवळ मंगळवारी दुपारी वाजता भूमिपुजन होईल. तर परतूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर मुख्य समारंभ होईल. पाणीपुरवठा स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्या संकल्पनेतून ही योजना तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने योजनेचे काम केले जाणार आहे. निम्न दूधना प्रकल्पातून या योजनेचा उद्भव असुन यात परतूर तालुक्यातील ७३, जालना तालुक्यातील मंठा तालुक्यातील ९५ अशा १७६ गावांचा समावेश केला आहे. समाविष्ट गावांची लोकसंख्या सध्या लाख ९५ हजार इतकी आहे तर २०३९ मधील लाख १७ हजार लोकसंख्या ग्रहीत धरुन योजना तयार केली जात आहे. २०१९ पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातून प्रत्येक व्यक्तीला दररोज ४० लिटर पाणी उपलब्ध होईल. या योजनेसाठी २३४ कोटी रुपये खर्च अपेक्षीत अाहे. ही योजना कार्यान्वीत झाल्यानंतर समाविष्ट गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही त्यांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल हा याेजनेचा प्रमुख हेतू असल्याचे लोणीकर यांनी सांगीतले. 

यांची राहणार उपस्थिती 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची तर शालेय शिक्षण मंत्री विनाेद तावडे यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपुजन करण्यात येईल. याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीष महाजन,पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर,भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, खासदार संजय जाधव आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 

अशी केली गावांची निवड 
या योजनेत समाविष्ट गावांपैकी १२४ गावांना २०१५-१६ मध्ये टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता किंवा त्यांचा टंचाई अराखड्यात समावेश होता. यात प्रत्येक गावाला मिटरद्वारे पाणी देण्याचे प्रस्तावीत आहे. त्यासाठी स्काडा ही स्वयंचलीत यंत्रणा कार्यान्वीत केली जाणार असल्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगीतले.
 
बातम्या आणखी आहेत...