आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आता स्पष्ट भूमिका घेण्याची गरज असून आरक्षणाचा प्रश्न राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवण्यात यावा यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांच्याकडे मागणी केली आहे.  उच्च न्यायालयातील सुनावणीत सरकार निश्चितच आरक्षणाचा प्रश्न आयोगाकडे सोपवेल, अशी मला खात्री असल्याचे शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  

मेटे म्हणाले की, शिवसंग्रामने मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावे यासाठी आंदोलने  केली असून मराठा समाजाने रस्त्यावर येऊन तशी मागणीदेखील केली आहे. मागील आघाडी सरकारने ईएसबीसी हा नवीन वर्ग निर्माण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. जो चुकीच्या पद्धतीने दिला गेला होता. मागणी वेगळी व निर्णय वेगळा असाच काहीसा हा प्रकार होता. या शासनाच्या विरोधात काही विघ्नसंतोषी लोक मुंबई उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यावर सुनावणी होत असून सरकारच्या वतीने महाभियोक्ता बाजू मांडत आहेत, तर शिवसंग्रामच्या वतीनेसुद्धा तज्ज्ञ वकील मराठा समाजाची बाजू मांडत आहेत. परवाच उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली असता त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने शासनाला स्पष्टपणे भूमिका मांडण्याचे निर्देश दिले आहेत. मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपवावा की नाही यावर शासनाच्या वतीने ४ मे २०१७ रोजी स्पष्ट सांगा, असे सांगितले आहे. त्यामुळे मंगळवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष विनोद तावडे यांच्याशी प्रत्यक्ष भेटून बाेलणे झाले आहे.
 
जे निर्णय घेतले त्याची  अंमलबजावणी करा  
मराठा माेर्चाच्या वेळी राज्य सरकारने काही निर्णय जाहीर केले होते. त्यातील वसतिगृहाला अजूनही सुरुवात झाली नाही. आगामी काळात एसबीसी प्रवर्गासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह सुरू करणे गरजेचे असून किरायाच्या जागा घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असे आमदार मेटे यांनी सांगितले.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...