आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: पूर्वसूचनेविना मनपाचे खोदकाम; स्वर्गरथ, रुग्णवाहिका अडकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गजानन महाराज मंदिर चौकात रस्त्याचे काम सुरू केल्याने बुधवारी सकाळी वाहतुकीची कोंडी झाली. यात एक रुग्णवाहिकाही अडकली.  (छाया : अरुण तळेकर) - Divya Marathi
गजानन महाराज मंदिर चौकात रस्त्याचे काम सुरू केल्याने बुधवारी सकाळी वाहतुकीची कोंडी झाली. यात एक रुग्णवाहिकाही अडकली. (छाया : अरुण तळेकर)
औरंगाबाद - दोन वर्षांपासून रखडलेले गजानन महाराज मंदिर ते सूतगिरणी आणि जयभवानी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले. मात्र, मंदिरासमोरील चौकात संबंधित ठेकेदाराने कोणतीही सूचना देता काम सुरू केल्याने बुधवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. दिवसभरात सुमारे २० हजार वाहनचालकांची या चौकात गैरसोय झाली. रुग्णवाहिकेसह एका अंत्ययात्रेत सहभागी लोकांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसला. 
 
शासनाकडून आलेल्या २४ कोटी रुपयांतून या दोन रस्त्यांची कामे केली जात आहेत. नऊ महिन्यांत चार रस्ते पूर्ण करायचे होते. मात्र, त्याला दोन वर्षे झाले तरी ही कामे अपूर्णच आहेत. आतापर्यंत सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर चौकापर्यंत रस्ता पूर्ण करण्यात आला. मंदिरासमोरील मुख्य चौक सोडून पुढे सूतगिरणी आणि जयभवानी चौकापर्यंत रस्त्याची कामे करण्यात आली. ड्रेनेजलाइन आणि पाइपलाइनच्या कामामुळे चौकातील रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला नव्हता. दोन दिवसांपासून कामाला गती आली आहे. जयभवानी चौक आणि सूतगिरणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे खोदल्याने हा रस्ता बंद केला. मात्र हा रस्ता बंद करण्याआधी मनपाने अधिकृत नोटीस अथवा आवाहन करून हा रस्ता बंद असल्याचे सांगणे गरजेचे होते. मात्र, त्याबाबत कोणतीच सूचना देता एका बाजूने खोदकाम सुरू केले. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक रखडली. सकाळी एक रुग्णवाहिका आणि स्वर्गरथही वाहतुकीत अडकून पडला. 
 
रस्त्याचा वापर टाळावा : आणखीमहिनाभर हे काम चालणार आहे. त्यामुळे मोठी वाहने, कारचालकांनी या रस्त्याचा वापर टाळणे सोयीचे ठरणार आहे. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, वाहतुक ठप्प झाल्याचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...