औरंगाबाद- सातारा परिसरातील अमोल (नाव बदललेले आहे) यांच्या दारात मंगळवारी पोलिस कर्मचारी जाऊन उभा राहिला. अमोलचे कुटुंबीय घाबरले. आपल्या घरातील सदस्याने काही गुन्हा तर केला नाही ना, अशी त्यांना शंका आली. विचारपूस केली असता, पोलिसाने शांतपणे अमोलच्या आईला सांगितले, १६ जानेवारी रोजी गुलमंडी चौकातून अमोल ट्रिपल सीट जात होता. ही घटना त्या चौकीतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याने वाहतूक नियम मोडला म्हणून त्याला दंड आकारण्यासाठी मी आलो आहे. अमोलनेदेखील त्याची चूक मान्य केली आणि दंडाची रक्कम भरली.
चौकातील सिग्नल तोडून आपल्याकडे कोणीच बघितले नाही, अशा अाविर्भावात वावरणाऱ्या वाहनचालकांवर आता चौकाचौकात तिसऱ्या डोळ्याची नजर पडत आहे. पोलिसांना गुंगारा देऊन नियम तोडणाऱ्या शंभरावर वाहनचालकांना रोज पावत्या दिल्या जात आहेत. त्यामुळे तरुणाईने सिग्नलवर घाई करता वाहतूक नियमांचे पालन केल्यास पोलिस घरी येऊन दंड आकारण्याची नामुष्की टाळता येईल.
स्मार्टअँड सेफ सिटीकडे वाटचाल : शहरसध्या स्मार्ट आणि सेफ सिटीकडे वाटचाल करत आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत शहरातील ३० चौकांत ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यासाठी आयुक्तालयात सर्व्हर रूम तयार करण्यात आली आहे. चौकातील प्रत्येक हालचाल टिपली जात आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रभातकुमार यांनी वाहतूक पोलिसांना उद्देशून एक पत्र जारी केले आहे. त्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांशी हुज्जत घालण्यापेक्षा त्यांचा वाहन क्रमांक, चेसीज मोबाईल क्रमांक टिपून घ्यावा. नंतर वाहनचालकाला पोलिस चौकीत बोलावून कारवाई करावी, असे म्हटले आहे.
असे प्रमाण
रोज घरी जाऊन १०० जणांना पावती देण्यात येते. यात मोठ्या प्रमाणावर तरुणांचा समावेश असतो.
४० राजकीयपक्षंाचे कार्यकर्ते
३०महाविद्यालयतरुण
१०महाविद्यालयतरुणी
२०इतरकामगार, नोकरदार
प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम
सध्याहाउपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. यासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या एकूणच उप्रकमातील काही त्रुटी शोधण्याचे काम सुरू असून त्यानंतर हा उपक्रम राबवण्यात येईल. - संदीप आटुळे, पोलिसउपायुक्त, मुख्यालय
पुढील स्लाइड्सवर वाचा, विशेष पोलिस महानिरीक्षकांचे पत्र....