आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात १२ ठिकाणी बसणार सिग्नल, स्थायी समितीत निविदेला अखेर मंजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात१२ ठिकाणी वाहतूक सिग्नल बसवण्याला आता मुहूर्त लागणार आहे. रोपळेकर हाॅस्पिटल चौक, उस्मानपुरा चौक, कोकणवाडी, एकता चौक (दर्गा चौक) यासह वाहतूक कोंडी होणारे चौक यात समाविष्ट करण्यात आले आहेत. या कामासाठीच्या निविदेला आज स्थायी समितीने मंजुरी दिली असून येत्या महिनाभरात या कामाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

शहरात अनेक चौकांत वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अपघातांचाही धोका वाढला आहे. ‘दिव्य मराठी’ने या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. २२ जानेवारीच्या ‘दिव्य मराठी’च्या अंकात उस्मानपुरा चौक कोकणवाडी चौकातील भीषण स्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता.

शहरात कोठे वाहतूक सिग्नल बसवायचे याबाबत पोलिस विभाग मनपा यांनी संयुक्तपणे निर्णय घ्यायचा असतो. जागा पोलिसांनी सुचवायच्या सिग्नल बसवणे देखभाल मनपाने करायची, असा प्रघात आहे. औरंगाबादेत वाहतूक कोंडीची समस्या उर्वरितपान.८

येथे बसवणार सिग्नल
रोपळेकरहाॅस्पिटल चौक, एन- पाण्याची टाकी, क्रांती चौक, एसबीओए चौक, हर्सूल टी पाॅइंट, कोकणवाडी चौक, उस्मानपुरा चौक, लिटल फ्लॉवर चौक, आंबेडकर चौक, एकता चौक (शहानूरमियाँ दर्गा चौक), सेव्हन हिल्स चौक अभिनय चौक.