आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका व्यक्तीसह पंचावन्न बकऱ्या ठार, चौघे जखमी; पळसवाडीजवळ ट्रक- टेम्पो अपघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महामार्गावर अपघातग्रस्त टेम्पो . (छाया: रमणलाल पंजाबी ) - Divya Marathi
महामार्गावर अपघातग्रस्त टेम्पो . (छाया: रमणलाल पंजाबी )
गल्लेबोरगाव - पळसवाडी गावाजवळील पुलावर ट्रक व बकऱ्यांनी भरलेल्या आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन आयशरमधील एका व्यक्तीसह ५५ बकऱ्यांचा मृत्यू झाला.  इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी सात वाजता घडली. जखमींना  ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  
 
नारायण जोतिसिंग धारवाल (५५, रा.काबखा, ता.मनावर, जि. धार, म.प्र.) असे मृत व्यक्तीचे तर सलमान खलील शहा  (२४), अनिल फुलचंद चव्हाण (रा.अंजान), शैलेश परमार, किरीट परमार हे गंभीर जखमी झाले आहेत.  
 
मध्य प्रदेशहून सोलापूरकडे बकऱ्या घेऊन जात असलेला आयशर टेम्पो  (एमएच १३ आर ४२१५) व औरंगाबादहून गुजरातकडे जात असलेला ट्रक (जीजे ०३ बीव्ही ७२८०) यांच्यात पळसवाडीच्या पुलावर धडक झाली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की यात आयशरच्या केबिनसह संपूर्ण एक बाजू कापली गेली व बकऱ्या इतरत्र फेकल्या गेल्या होत्या.  या अपघातात  नारायण धारवालांसह बकऱ्या ठार झाल्या. 
 
अपघातात दुचाकीस्वार ठार
लासूर स्टेशन - काळीपिवळी जीपचालक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना जीपचा एका दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीस्वार कोसळला. त्याला मागून आलेल्या दुचाकीने ठोकरल्याने  तो जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी नाशिक-औरंगाबाद मार्गावरील किन्हळ फाट्यावर घडली. विक्रम बनकर (रा. सोनखेडा, ता. खुलताबाद) असे मृताचे नाव आहे.   दोन दुचाकी एकामागोमाग जात असताना काळी-पिवळी (एमएच २० एए ६८२९) जीपचा एका दुचाकीला धक्का लागला. दुचाकीस्वार विक्रम चंद्रभान बनकर खाली पडला असता मागून येणाऱ्या दुचाकीवर गौतम पठारे (रा. बोरसर) हे त्या पडलेल्या दुचाकीवर धडकले. यात विक्रम बनकर गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...