आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर : मालवाहू ट्रक-अॅपेरिक्षाची टक्कर; 12 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - मालवाहू ट्रक व अॅपेरिक्षाच्या समोरासमोर झालेल्या धडकेत १२ जण जखमी झाले. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नागपूर -मुंबई द्रुतगती महामार्गावरील लाडगाव चौफुलीजवळ हा अपघात घडला. अॅपेरिक्षात जखमी झालेले सर्व प्रवासी शिंगवे (ता. राहाता, जि.अहमदनगर) तालुक्यातील रहिवासी आहेत. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, जखमींत महिला व बालकांचा समावेश आहे.  

 पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगवे येथील सुनीता सुनील ठोंबरे या माहेरी प्रसूती झाल्यानंतर त्यांना सासरकडील मंडळी शिवराई येथील बाबूराव शंकर डुकरे यांच्याकडे पाहुणचार आटोपून अॅपेरिक्षाने (एमएच १७ एजी १७३१) शिंगवे गावाकडे परतत असताना नागपूर-मुंबई हायवेवरील लाडगाव चौफुलीजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू रिक्षा (एमएच १५ डीके २३१०) धडक झाली. यात अॅपे रिक्षातील नर्मदा दत्तू ठोंबरे (५०), अरुणा पंढरीनाथ ठोंबरे (४५), दत्ता  पवार (४६), लीला भोसले (४८), सिंधू शिंदे (४०), वनिता गोजरे (३५), दत्तू ठोंबरे (७०), सुनीता ठोंबरे (४०), सिद्धांत ठोंबरे (२ महिने), वैष्णवी ठोंबरे (६), वेदांत ठोंबरे (सर्व रा.शिंगवे ता.राहाता, जि.नगर) तसेच रिक्षाचालक राहुल पवार (रा.वैजापूर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना जिल्हा परिषद सदस्य प्रा.रमेश बोरनारे,  माजी सभापती बाबासाहेब जगताप यांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवलेे.  यातील सहा जणांना गंभीर दुखापत झाल्याने  खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.  
बातम्या आणखी आहेत...