आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुपेंची आवराआवर, आज राजीनामा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - युतीतील करारानुसार महापौर त्र्यंबक तुपे उपमहापौर प्रमोद राठोड बुधवारच्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देणार आहेत. त्यासाठीच ही सभा बोलावण्यात आली आहे. राजीनाम्यानंतर तुपे राठोड फक्त नगरसेवक असतील. त्यामुळे तुपे यांनी मंगळवारीच पालिका मुख्यालयात आवराआवर केली. महापौर दालनाती लॉकर्मचारी तसेच महापौर बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना स्नेहभोजनही दिले.
तुपे सकाळच्या सत्रात मुख्यालयात दाखल झाले. आयुक्त ओमप्रकाश बकोरिया हेही मुख्यालयात असल्याचे समजल्यानंतर त्यांना चर्चेसाठी बोलावले. दोघांत बंद दाराआड सुमारे २५ मिनिटे चर्चा झाली. आयुक्त मुख्यालयातून बाहेर पडल्यानंतर ते उपायुक्त (अास्थापना) अय्युब खान यांच्या दालनात गेले. स्वत:हून अधिकाऱ्याच्या दालनात जाण्याची त्यांच्या १९ महिन्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच वेळ होती. तेथे ते अर्धा तास होते. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. त्यानंतर ते ‘रायगड’ या महापौरांच्या बंगल्यावर गेले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत स्नेहभोजन घेतले. इकडे उपमहापौर राठोडही दुपारनंतर त्यंाच्यासमवेत होते.
बातम्या आणखी आहेत...