आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण अधिकारी, टंकलेखकास अटक, ट्रेनिंग सेंटर परवानगीसाठी 10 हजारांची लाच घेतली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरला टॅली अभ्यासक्रमाचा कोर्स सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी अहवाल चांगला पाठवण्यासाठी लाच मागणाऱ्या जिल्हा व्यवसायिक शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. शशिकांत गुंटूरकर सुरेश नारगुल्ला अशी आरोपींची नावे आहेत. 
 
३२ वर्षीय नागरिकाच्या तक्रारीनुसार त्याचे स्वत:चे ग्रोथ व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर आहे. त्यांनी राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाकडे टॅली कोर्स सुरू करण्यासाठी परवानगी मागितली. 
संस्था पाहणीकरून त्याचा अहवाल देण्याचे काम जिल्हा व्यवसायिक शिक्षण विभागाचा प्रशिक्षण अधिकारी शशिकांत गुंटूरकर लुघ टंकलेखक सुरेश नरगुल्ला यांच्याकडे होते. संस्थेचा चांगला सकारात्मक अहवाल देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची मागणी केली.
 
 परंतु तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाचे अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विवेक सराफ, निरीक्षक अनिता वराडे पथकाने सापळा रचून आरोपींना लाच घेताना रंगेहाथ अटक केली. 
बातम्या आणखी आहेत...