आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किया मोटर्स औरंगाबादेत, ह्युंदाई चेन्नईत; दिवाळीपूर्वी घोषणा शक्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सेऊलच्या हयुंदाई मोटर्स समूहाची कंपनी किया मोटर्सने औरंगाबादेतील शेंद्रा डीएमआयसीत प्रकल्प थाटण्याचे निश्चित केले आहे. ह्युंदाईचा चेन्नईत प्रकल्प असल्याने औरंगाबादेत याच समूहाची उपकंपनी किया मोटर्स येणार, असे ठरले आहे. याच आठवड्यात ही घोषणा हाईल असे सूत्रांनी सांगितले. या प्रकल्पामुळे १० हजार जणांना रोजगार मिळेल.

औरंगाबादला मंत्रिमंडळाची ४ ऑक्टोबरला बैठक झाली तेव्हा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यासंदर्भात कोरियात चर्चा सुरू असल्याचे सांगितले. या संदर्भात राज्याचे उद्योग सचिव अपूर्व चंद्रा, एमआयडीसीचे सीईओ संजय सेठी, ऑरिकचे संचालक विक्रमकुमार कोरियाला गेल्याचे वृत्त सर्वप्रथम दिव्य मराठीने ६ ऑक्टोबरला प्रसिध्द केले होते. याच दौऱ्यात निर्णय झाला.
काय आहे किया : किया मोटर्स ही दक्षिण कोरियातील कार उत्पादनातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीची २०१५ मधील उलाढाल ४६.९ अब्ज डॉलर असून कंपनी ३० लाख ते दीड कोटी किमतीच्या लक्झरी कार बनवते. वर्षात ३.३ दशलक्ष वाहन निर्मितीचा विक्रमही कियाच्या नावावर आहे.

सीएमआयए ने दिला होता पहिला प्रस्ताव
डीएमआयसीची घोषणा होताच पहिले पत्र राज्यशासनासह किया मोटर्सला सीएमआयए संघटनेने २०१३ मध्ये पाठवले होते. सतत पाठपुरावाही केला. त्याचाही सकारात्मक परिणाम होऊन किया मोटर्सचे अधिकारी शेंद्य्रात येऊन जागा पाहून गेले. लोकसंख्या, राहणीमान, जमिनीचे नेमके स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची,जमीनीचा चढ उतार, प्लॅन्टची दिशा यांचा सखोल अभ्यास किया मोटर्सने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...