आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीआय घोटाळ्यात 84 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 6.7 कोटींची झाली फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आठ दिवसांच्या प्रदीर्घ खलानंतर अखेर शनिवारी बँक ऑफ महाराष्ट्रने यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) घोटाळ्याबाबत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. बँकेच्या औरंगाबाद विभागाचे उपविभागीय व्यवस्थापक रवींद्र दत्तात्रय सोनजे यांनी तक्रार दिली असून त्यात किरण अण्णासाहेब गवाड, रामचंद्र भोसले यांच्यासह ८४ खातेदारांचा समावेश आहे. ज्यांच्या खात्यातील पैसे काढले गेले असे खातेदारही आरोपींच्या कठड्यात आहेत. एकूण कोटी लाख रुपयांची बँकेची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 
 
स्मार्टफोनमधील बँक ऑफ महाराष्ट्राचे यूपीआय अॅप वापरून पूल अकाउंटमधून कोटी लाख रुपये गायब झाल्याचे ११ मार्च २०१७ रोजी बँक प्रशासनाच्या लक्षात. अनेक खात्यांमध्ये एक रुपयाही नसताना त्या खात्यांतून लाख रुपये उचलल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला. 

सुरुवातीला याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी दोन आणि सिडको पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. असे व्यवहार समोर आल्यावर बँकेकडून तत्काळ ४०० खाती गोठवण्यात आली. विशेष म्हणजे या खातेधारकांनी त्यांचा मोबाइल किंवा सिमकार्ड दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यास दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे या खातेधारकांवर गुन्हा नोंदवा, अशा सूचना बँकेचे विभागीय व्यवस्थापक दिनकर संकपाळ यांनी शाखा व्यवस्थापकांना दिल्या होत्या. 
 
बँकेअंतर्गतसुद्धा घोटाळ्याचा आकडा निश्चित करण्यासाठी विभागीय व्यवस्थापकापासून शाखा व्यवस्थापकापर्यंत सर्व अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत होते. प्रथम शाखानिहाय तक्रार देण्याचे बँक प्रशासनाने ठरवले होते. 
 
मात्र पोलिस आयुक्तांच्या सूचनेनंतर औरंगाबाद विभागातील ३० पेक्षा अधिक शाखांत अशा प्रकारे घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यामुळे एकाच पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार शनिवारी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह उपनिरीक्षक सतीश जाधव, सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे यांचे पथकही या घोटाळ्याचा तपास करत आहे.
 
एनपीसीआयचे असते नियंत्रण: दोन बँकांर्गतच्या व्यवहारांवर एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कंट्रोल ऑफ इंडिया) या केंद्रीय संस्थेचे नियंत्रण असते. ही संस्था रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार काम करते. 
 
प्रत्येक बँकेचे या संस्थेकडे पूल अकाउंट असते. खातेदार एनईएफटी, आरटीजीएससारखे व्यवहार करतात, त्यांचे पैसे या पूल अकाउंटमधून दिले जातात. ही संस्था संबंधित बँकेकडून तत्काळ ही रक्कम परत घेते. रोज या अकाउंटची टॅली होते. यूपीआय अॅपद्वारे व्यवहार करताना एनपीसीआयचा आधार घेतला जातो. 
 
या यंत्रणेच्या सूचनेनुसारच यूपीआय अॅप तयार केले गेले. प्रत्येक बँकेसाठी हे अॅप स्वतंत्र असून इन्फ्राटेक नावाची कंपनी बँक ऑफ महाराष्ट्रसाठी काम करते. दरम्यान, “दिव्य मराठी’ने आयटी तज्ज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी यूपीआय अॅपचे व्यवहार करताना त्या अॅपचा पिन द्यावा लागतो. पूल खात्यातून पैसे कमी होतात त्यावेळी बँकेलाही कळवण्यात येते. या तांत्रिक बाबीत काहीतरी चूक झाली असावी, असे मत मांडले. 

या कलमांखाली झाली अटक 
बँकेच्या तक्रारीनंतर कलम ४२० (फसवणूक), १२० बी (कट रचणे) आणि ६६ (सी) (माहिती तंत्रज्ञान कायदा ) आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दोन, सिडको पोलिस ठाण्यात भगवान परकळ, बापू ज्ञानेश्वर मोरे, विजय जाधव, सतीश जाधव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात अाली आहे. वाळूज पोलिसांनी किशोर देशमुख याला अटक केली असून एमआयडीसी सिडको पोलिसांनी राजेशच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री राजेश निर्मल विश्वास (२७, रा. चंद्रपूर, ह. मु. वाळूज) याला अटक केली. त्याचे वाळूज परिसरात कंप्रेशन यंत्राचे दुकान आहे. बॅचलर ऑफ मॅनेजमेंटची पदवी घेतलेल्या राजेशने शाहू नावाच्या व्यक्तीच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यावरून लाख रुपये डेबिट केल्याचे समोर आले आहे. तब्बल वेळा वेगवेगळ्या दिवशी त्याने लाख रुपये काढले. याची कल्पना शाहूलाही नव्हती. बँकेने शाहूचे खाते होल्ड केले तेव्हा ही बाब समोर आली. लाखातून राजेशने साडेतीन लाख रुपयांची उधारी फेडली. पाच लाख रुपये इतरांना व्याजावर तसेच उधार दिले. तर ५० हजार रुपयांत मौजमजा केली. वडील संरक्षण खात्यामध्ये असल्याचे तो सांगतो. त्याच्या कारनाम्याची त्याच्या घरच्यांना कल्पनाही नाही. विशेष म्हणजे, १५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून मी घोटाळा केल्याचे तेथील अधिकाऱ्यांना कळवल्याचे विश्वास याने पोलिसांना सांगितले. 
 
मॅनेजमेंट पदवीधराने केली फसवाफसवी 
- यूपीआय घोटाळ्याची व्याप्ती वाढली; पूल खात्यातून झाले व्यवहार 
-विश्वासने साडेतीन लाखांची उधारी फेडली 
-पाच लाख रुपये उधार दिले 
- ५० हजार रुपयांची केली ऐश 
बातम्या आणखी आहेत...