आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर शहराला आता चार दिवसांआड मिळणार पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - नाशिक पाटबंधारे विभागाने नगरपालिकेला  पिण्याचे पाणी आवर्तन सोडण्यास विलंब होणार असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवल्यामुळे पालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. घोयेगाव येथील पालिकेच्या साठवण तलावात १० मेपर्यंत शहराची तहान भागेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला असून  शहराला आता चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे  नियोजन आखले आहे. यापूर्वी २ एप्रिलपासून शहराला ३ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात होता.
 
नाशिक पाटबंधारे विभागाकडून पालिकेला करारानुसार पिण्यासाठी दरमहा पाणी आवर्तन दिले जाते, मात्र दारणा समूहातून मे महिन्यात पाणी आवर्तन सोडण्यास उशीर लागणार असल्याने पालिकेने घोयेगाव येथील उपलब्ध पाणीसाठ्यातून शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय घेतला. कडक उन्हाच्या तडाख्यामुळे साठवण तलावातील पाण्याच्या होणाऱ्या बाष्पीभवनामुळे साठवण तलावातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यातच मे महिन्याचे पाणी आवर्तन लांबल्यामुळे शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पालिकेच्या साठवण तलावात १० मेपर्यंत पाणीसाठा उपलब्ध आहे.

मे महिन्याचे पाणी आवर्तन दुसऱ्या आठवड्यात प्राप्त होईपर्यंत निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाणी कपातीचे नियोजन केले. नाशिक पाटबंधारे विभागाकडून पालिकेला दारणा समूहातून गोदावरी डाव्या तट कालव्यातून वर्षभर एकूण ७८ एमसीएफटी पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याचा करार केला आहे. तथापि ऐन उन्हाळयात पाणी आवर्तनांच्या दिवसात मोठा खंड वाढल्याने पालिका प्रशासनाने शहरात पिण्याच्या पाणीपुरवठ्यात काटकसर करण्याचा निर्णय घेतला.
 
पालिकेचे पाच साठवण तलाव  पालिकेच्या घोयेगाव येथील ३० कोटी लिटर क्षमतेच्या पाच साठवण तलावांत १० मेपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. ५० हजार लोकसंख्येच्या पालिकेकडे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे एकूण दोन स्रोत आहेत. त्यापैकी नारंगी मध्यम प्रकल्प हा कायमस्वरूपी स्रोत आहे. पावसाच्या अवकृपेमुळे गेल्या वर्षात तो कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे एकमेव नाशिक विभागाकडून उपलब्ध पाणी आवर्तनावर पालिकेच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ४१ हजार २९७ लोकसंख्या असून तरंगती लोकसंख्या ५० हजार आहे.

वरिष्ठांकडे केला पत्रव्यवहार
वैजापूरपासून १७ किमी अंतरावरील घोयेगाव येथे पालिकेचे ३५ कोटी लिटर क्षमतेचे पाच साठवण तलाव आहेत.  शहरवासीयांना  पुरवठा केला जातो. दरम्यान, मुख्याधिकारी विठ्ठल डाकेंनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाणी आवर्तन लवकर सोडण्यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...