आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात पाच हजार हेक्टरवर कांदा लागवड; क्षेत्र 50 टक्क्यांनी वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर  - जिल्ह्यात कांदा उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून वैजापूरची खास ओळख आहे. शेती व्यवसायात कांदा उत्पादकांनी कमी अधिक पाऊसमान आणि दराच्या झळा सोसत निष्ठेने कांदा उत्पादनाचा टक्का टिकवून धरला आहे.  चालू वर्षात दमदार पाऊसमानामुळे उन्हाळा हंगामातील कांदा लागवडीच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे.
 
 जवळपास पाच हजार हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या वर्षात अत्यल्प पावसामुळे शेती उत्पादनात आर्थिक अडचणीच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनातून आर्थिक नैराश्य दूर करण्यासाठी कंबर कसली आहे. 
 
या वर्षात खरीप हंगामातील लाल कांदा पिकाला २०० ते ७०० रुपयेचा भाव शेतकऱ्यांच्या पदरात पडला होता. दरम्यान, उन्हाळी कांद्याला प्रतिक्विंटल समाधानकारक भाव मिळेल या अपेक्षेतून कांदा लागवडीवर भर दिला आहे. विशेषत: मजुरी, कांदा रोपे, औषधे, खते असा लागवडीचा वाढत्या खर्चाचा भार सोसत लागवड केली आहे.
 
 सध्या उन्हाळ हंगामातील परिपक्व झालेला कांदा काढणीला आला आहे. बाजारभाव पाचशे ते आठशे रुपयेपर्यंत स्थिर आहेत. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात कांदा लागवडीचे प्रमाण पन्नास टक्क्यांनी वाढले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...