आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० शेतकरी सोमवारी करणार आत्मदहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - कृषी विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे गेल्या दोन वर्षांपासून शेततळे, शेडनेट, ठिबक सिंचन व फळबागा पुनरुज्जीवन या योजनांचे अनुदान न मिळाल्याने तालुक्यातील टुणकी येथील जवळपास ५० शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. २८) येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. टुणकी येथील शेतकऱ्यांनी कर्ज काढून सामूहिक शेततळे खोदले. तर काहींनी ठिबक सिंचनचे संच बसवले.
कृषी सहायकांनी सामूहिक शेततळ्यांचे फोटो काढून पंचनामे केले व त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला, परंतु कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे दोन वर्षे उलटूनही शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणतेही अनुदान मिळालेले नाही. निवेदनावर आशाबाई गोरे, मंदाबाई गोरे, कल्याणबाई जाधव, अप्पाराव निकम, भास्कर निकम, दादासाहेब निकम, दगडू जाधव, जालिंदर थोरात, अशोक नागे, सुधाकर निकम आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.