आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ, अजिंठा लेणीसाठी आता ३० रुपये लागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ- उन्हामुळे अधिकच ओस पडलेल्या वेरूळ अजिंठा लेणीत आता तिकीट दरवाढीमुळे परिणाम होणार असल्याची चिन्हे आहेत. पूर्वी दहा रुपये दरावरून आता माणशी ३० रुपये दर करण्यात आला आहे. दरवाढ एप्रिलपासून लागू झाली असून दरवाढीनंतरही सुविधांमध्ये कोणतीही वाढ नसल्याने पर्यटकांमध्ये संतापाचे वातावरण होते. वेरूळ अजिंठा येथे पर्यटकांची दरवाढीमुळे तिकीट खिडकीवर हमरीतुमरी झाल्याचे दिवसभर चित्र दिसून आले.

दहा रुपयांच्या छापील तिकिटांवर ३० रुपयांचा शिक्का मारून तिकीट विक्री सुरू होती. तिकिटाचे दर १० रुपयांवरून तीस रुपये केल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करत होते. भारतीयांसाठी ३० रुपये दर असून विदेशी पर्यटकांसाठी पूर्वीच्या २५० रुपयांवरून थेट पाचशे रुपये दरवाढ करण्यात आली. तिकीट दुप्पट वाढल्याने पर्यटनवाढीवर परिणाम होऊन स्थानिक व्यावसायिक आर्थिक अडचणीत येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ लेणीस भेट देण्याकरिता दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. यात देशभरासह विदेशी पर्यटकांची मोठी संख्या आहे. प्रशासनाने एप्रिलपासून या दरात मोठी वाढ करत शनिवारपासून दर आकारण्यास सुरुवात केली असल्याने या दरवाढीमुळे पर्यटक कर्मचाऱ्याचे तिकीट खिडकीवर दिवसभर खटके उडताना पाहावयास मिळत होते. तसेच पर्यटक संख्याही रोडावली आहे.
सुविधेतवाढ नाही
वेरूळपर्यटनस्थळी तिकीट दरामध्ये मोठी वाढ करण्यात आली असली तरी सुविधांमध्ये सध्या तरी कोणतीही वाढ करण्यात आली नसून हे तिकीट फक्त प्रवेशासाठी आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सुरू दिसून आला.

अन्य सुविधा नाहीत
तीसपाचशेहे तिकीट आतमध्ये जाण्याकरिता आहे. यामध्ये वेगळी सुविधा नाही. परंतु या ठिकाणी सर्वच पर्यटकांकरिता सोयी- सुविधा वाढवण्याचे आमचे प्रयत्न चालू आहेत. तिकीट दरवाढीचा नियम कालपासून आमच्याकडे आला असल्याने जुन्या तिकिटावर शिक्का मारून आम्ही वापरत आहोत. - हेमंत हुकरे, संवर्धनसहायक, वेरूळ लेणी