आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक लेणी कोरणारे कारागीर महान व्यक्ती : झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरूळ   - वेरूळ लेणीची कारागिरी ही शब्दांत व्यक्त करण्यासारखी नसून ती प्रत्यक्षात अनुभवण्यासारखी अाहे. या लेणी बनवणारे कारागीर सामान्य नव्हे तर महान व्यक्ती असाव्यात. असेच येथील कारागिरीवरून दिसून येते. आज लाखो लोक या सुंदर कलाकृती पाहत, अनुभवत आहेत. हा खूप मोठा वारसा  या कारागिरांनी ठेवला. या लेणी बनविण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले असतील त्या सर्वांना मला नमन करावे वाटते, असे मत झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी  दिव्य मराठीशी बोलताना  व्यक्त केले.  
 
मुर्मू यांनी रविवारी  वेरूळ येथील कैलास लेणी, बुद्ध लेणी, जैन लेणीला भेट दिली. या वेळी संपर्क अधिकारी अंजली धानोरकर, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर , खुलताबाद तहसीलचे तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड, संवर्धन सहायक आर. यू. वाकळेकर , पोलिस निरीक्षक हरीश खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत उपस्थित होते.
 
मुर्मू यांची अजिंठा लेणीलाही भेट
फर्दापूर - झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी (९ जुलै) अजिंठा लेणीला भेट दिली.   त्यांनी लेणी क्रमांक. १,२, ४ व  १० बघितल्या. लेणी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर महामंडळाचे पर्यटन निवास येथे त्यांनी भोजन केले. त्यानंतर त्यांचे प्रशासकीय पातळीवर स्वागत करण्यात आले. या वेळी एस. बी. गोराड, तहसीलदार छाया पवार, धनशेट्टी, शरद जऱ्हाड, सुजित बडे, नीलेश घोरपडे, राजू काकडे, बाजीराव धनवट उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...